कोळसा खाणीत भीषण स्फोट; आगीत 52 कामगारांचा होरपळून मृत्यू, 38 जण जखमी I Russia | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Russia Coal Mine Accident

केमेरोवो भागातील कोळसा खाणीत लागलेल्या आगीत 52 जणांचा मृत्यू झालाय.

कोळसा खाणीत भीषण स्फोट; आगीत 52 कामगारांचा होरपळून मृत्यू

sakal_logo
By
टीम ई-सकाळ

Russia Coal Mine Accident : रशियातील सायबेरियामध्ये एक मोठी दुर्घटना घडलीय. केमेरोवो भागातील कोळसा खाणीत लागलेल्या आगीत 52 जणांचा मृत्यू झालाय. यात सहा बचावकर्त्यांचा देखील समावेश आहे. ही दुर्घटना गुरुवारी घडली. पाच वर्षांतील हा सर्वात प्राणघातक खाण अपघात असल्याचं मानलं जातंय. रशियन न्यूज एजन्सी TASS ने दिलेल्या माहितीनुसार, प्राथमिक तपासात असं दिसून आलंय की, Listvyazhnaya Mine खाणीत वाचलेल्या कोणत्याही व्यक्तीला वाचवण्याची संधी नव्हती. अजूनही अनेक मृतदेह आतमध्ये असून त्यांना बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

यापूर्वी कोळशाच्या धुरामुळं 11 खाण कामगारांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली होती. ते 250 मीटर खोलीवर काम करत होते (Russia Mine Incident). स्थानिक प्रशासनाचं म्हणणं आहे, की 38 जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून, त्यापैकी चार जणांची प्रकृती गंभीर आहे, तर 13 जणांना रुग्णालयात दाखल न करता उपचार करण्यात आले आहेत. अपघाताच्या वेळी भूमिगत 285 लोक काम करत होते आणि त्यापैकी बहुतेकांना खाणीतून लवकर बाहेर काढण्यात आल्याचं समजतंय.

हेही वाचा: भारतात पहिल्यांदाच पुरुषांच्या तुलनेत महिलांची संख्या सर्वाधिक

मोठ्या स्फोटानंतर आग

कोळसा खाणीत जोरदार स्फोटानंतर ही आग लागलीय. हा स्फोट अचानक झाला, त्यामुळं अनेकांना पळून जाण्याची संधीही मिळाली नाही. घटनेची माहिती मिळताच, बचावकर्ते आणि पोलीस तिथं पोहोचलेत. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन (Vladimir Putin) यांनी मृतांच्या कुटुंबीयांप्रती शोक व्यक्त केलाय. तर, केमेरोवो प्रदेशात शुक्रवार ते रविवार तीन दिवसांचा दुखवटा जाहीर केला आहे.

loading image
go to top