देश बदल रहा है! भारतात पहिल्यांदाच पुरुषांच्या तुलनेत महिलांची संख्या सर्वाधिक NFHS Survey | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Women

राष्ट्रीय परिवार आणि आरोग्य सर्वेक्षण (NFHS) च्या मते देशात पुरुषांच्या तुलनेत महिलांची संख्या सर्वाधिक आहे.

भारतात पहिल्यांदाच पुरुषांच्या तुलनेत महिलांची संख्या सर्वाधिक

sakal_logo
By
टीम ई-सकाळ

NFHS-5 Sex Ratio Data : देशात प्रथमच पुरुषांच्या तुलनेत महिलांची लोकसंख्या वाढलीय. आता दर 1,000 पुरुषांमागे 1,020 महिला आहेत. पुरुषांच्या तुलनेत महिलांची लोकसंख्या 1000 च्या वर पोहोचण्याची स्वातंत्र्यानंतरची ही पहिलीच वेळ आहे. राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षण-5 (NFHS-5) मध्ये ही आकडेवारी समोर आलीय. केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं बुधवारी ही आकडेवारी जाहीर केली. यापूर्वी 2015-16 मध्ये आयोजित केलेल्या NFHS-4 मध्ये ही संख्या दर 1,000 पुरुषांमागे 991 महिला होती.

या आकडेवारीवरुन स्पष्ट होतं की, भारतात आता महिलांची संख्या सातत्यानं वाढत आहे. 1990 च्या काळात 1000 पुरुषांच्या तुलनेत महिलांची संख्या 927 होती. 2005-06 मध्ये तिसऱ्या NHFS सर्वे मध्ये ते 1000-1000 सोबत बरोबर होते. त्यानंतर 205-16 मध्ये चौथ्या सर्व्हेत या आकडेवारीत पुन्हा घट दिसून आली. 1000 पुरुषांच्या तुलनेत 991 महिला होत्या. परंतु, पहिल्यांदाच आता महिलांची संख्या ही पुरुषांपेक्षा अधिक झालीय. एवढंच नाही, तर लिंग गुणोत्तरातही सुधारणा झालीय. 2015-16 मध्ये 1000 मुलांमागे 919 मुली होत्या, त्या आता 2019-21 मध्ये 1000 मुलांमागे 929 मुलींवर सुधारलं आहे.

हेही वाचा: काँग्रेस घाबरली? कार्यालयात लावला इंदिरा गांधींसोबत सरदार पटेलांचा PHOTO

NFHS-5 डेटामध्ये हे देखील समोर आलंय, की लिंग गुणोत्तरातील सुधारणा शहरांपेक्षा खेड्यांमध्ये चांगली झालीय. खेड्यांमध्ये दर 1,000 पुरुषांमागे 1,037 महिला आहेत, तर शहरांमध्ये 985 महिला आहेत. NFHS-4 मध्येही हीच बाब समोर आली आहे. त्या सर्वेक्षणानुसार खेड्यांमध्ये 1,000 पुरुषांमागे 1,009 महिला आणि शहरांमध्ये 956 महिला होत्या.

हेही वाचा: VIDEO : पाईपमधून निघू लागल्या नोटा अन् पाण्यासारखा पैसा पाहून..

23 राज्यांत 1000 पुरुषांमागे महिलांची लोकसंख्या 1000 पेक्षा जास्त

देशात 23 राज्ये अशी आहेत, की जिथं दर 1000 पुरुषांमागे महिलांची लोकसंख्या 1000 पेक्षा जास्त आहे. उत्तर प्रदेशात दर हजार पुरुषांमागे 1017 महिला, बिहारमध्ये 1090, दिल्लीत 913, मध्य प्रदेशात 970, राजस्थानमध्ये 1009, छत्तीसगडमध्ये 1015, महाराष्ट्रात 966, पंजाबमध्ये 938, हरियाणामध्ये 926, झारखंडमध्ये 1050 महिला आहेत.

सन 1901 मध्ये लिंग गुणोत्तर दर हजार पुरुषांमागे 972 स्त्रिया होत्या. पण, स्वातंत्र्यानंतर ही संख्या कमी झाली. 1951 मध्ये हा आकडा दर हजार पुरुषांमागे 946 महिलांवर कमी झाला. 1971 मध्ये ते 930 पर्यंत खाली आले. 2011 च्या जनगणनेनुसार, या आकड्यात किंचित सुधारणा झाली आणि दर हजार पुरुषांमागे महिलांची लोकसंख्या 940 वर पोहोचली.

हेही वाचा: मरेपर्यंत पवारसाहेबांची साथ सोडणार नाही; पण..

प्रजनन दरही झाला कमी

NFHS-5 सर्वेक्षणानुसार, देशातील प्रजनन दरातही (Fertility Rate) घट झालीय. जनन दर म्हणजे, लोकसंख्येच्या वाढीचा दर. सर्वेक्षणानुसार देशातील प्रजनन दर 2 वर आला असून 2015-16 मध्ये ते 2.2 होते. सर्व्हेतील आणखी काही आकडेवारीनुसार, 15 वर्षाहून कमी वय असलेली जनसंख्या जो 2005-06 मध्ये 35.6 टक्के होता. 2019-21 मध्ये घट होत 26.5 झाला आहे. भारत आता सुद्धा तरुण देश आहे. नॅशनल फॅमिली हेल्थ सर्व्हे-5 नुसार एका महिलेद्वारे आपल्या आयुष्यात मुलाला जन्म देण्याची एकूण संख्य 2.2 वरुन 2 झाली आहे, तर गर्भनिरोधक प्रसार दर 54% वरून 67% पर्यंत वाढला आहे. NFHS-5 मध्ये 2019-20 या वर्षात झालेल्या सर्वेक्षणातील डेटा एकत्रित करण्यात आला. या दरम्यान जवळजवळ 61 लाख घरांचे सर्वेक्षण करण्यात आले.

हेही वाचा: राष्ट्रवादीच्याच संचालकाला अध्यक्षपदावर संधी

loading image
go to top