युक्रेनमधील लष्करी कारवाई तात्काळ थांबवावी; ICJ चे रशियाला आदेश

Russia-Ukraine War nato chief says russia may use chemical weapons on Ukraine
Russia-Ukraine War nato chief says russia may use chemical weapons on Ukraine Sakal

रशिया आणि युक्रेन यांच्यात मागील काही दिवसांपासून युध्द सुरु असून रशियाने युक्रेनवरील केलेली लष्करी कारवाई तात्काळ स्थगित करावी असे आदेश आंतराष्ट्रीय न्यायालयाने (international court of justice) दिले आहेत. न्यायालयाने युद्धावर निर्णय देताना रशियाला हल्ला करणे तात्काळ थांबवण्यास सांगितले आहे.

न्यायालयाने दिलेल्या या निर्णयानंतर, युक्रेनने आयसीजेमध्ये रशियाविरुद्धच्या खटल्यात पूर्ण विजय मिळवला असून ICJ ने हे आक्रमण त्वरित थांबवण्याचे आदेश दिले आहेत, तसेच हा आदेश आंतरराष्ट्रीय कायद्यानुसार बंधनकारक आहे. रशियाने त्वरित त्याचे पालन केले पाहिजे. आदेशाकडे दुर्लक्ष केल्यास रशिया आणखी एकाकी होईल असे मत युक्रेनचे अध्यक्ष वोलोदिमीर झेलेन्स्की यांनी म्हटले आहे. युक्तिवाद संपल्यानंतर आठवडाभरानंतर आंतरराष्ट्रीय न्यायालयाने बुधवारी युक्रेन-रशिया युद्धात आपला निकाल जाहीर केला.

Russia-Ukraine War nato chief says russia may use chemical weapons on Ukraine
'द काश्मिर फाईल्स' महाराष्ट्रात करमुक्त नाहीच; अजित पवार म्हणाले..

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com