Russia Deploys Nuclear Submarine ‘Khabarovsk’: रशियाने ‘खाबरोव्स्क’ नावाची अत्याधुनिक आण्विक पाणबुडी सज्ज केली असून, त्यावर ‘पोसायडन’ आण्विक ड्रोन तैनात करण्यात आले आहेत. या पाणबुडीमुळे रशियाच्या नौदल शक्तीत मोठी भर पडली आहे.
मॉस्को : रशियाने आपली अत्याधुनिक अण्वस्त्रवाहू पाणबुडी सज्ज केली असून, या पाणबुडीवर पोसायडन आण्विक ड्रोन तैनात करण्यात आले आहे. डुम्सडे मिसाइल (निर्वाणीच्या क्षणी वापरले जाणारे अस्त्र) म्हणून पोसायडन ओळखले जाते.