Russia praises Donald Trump after Slam Zelensky's : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोल्दोमिर झेलेन्स्की यांना मूर्ख राष्ट्राध्यक्ष म्हणत खडेबोल सुनावले आहेत. तसेच झेलेन्की हे लाखो लोकांच्या आयुष्याशी खेळत असून तिसऱ्या महायुद्धाला निमंत्रण देत आहात, असं म्हणत त्यांनी नाराजीही व्यक्त केली आहे. ट्रम्प-झेलेन्स्की यांच्यातील बैठकीचा व्हिडीओ आता माध्यमांपुढे आला आहे. त्यानंतर आता जगभरातून प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत.