Russian Presidential Elections : पुतीन यांचा एकतर्फी विजय निश्‍चित! तीन दिवस चालणार मतदान प्रक्रिया

Russian Presidential Elections : रशियात अध्यक्षपदाच्या निवडीसाठी शुक्रवारपासून मतदानाला सुरुवात झाली.
Russia presidential elections latest update Voting  vladimir putin fifth term marathi news
Russia presidential elections latest update Voting vladimir putin fifth term marathi news
Updated on

मॉस्को, ता.१५ (पीटीआय) ः रशियात अध्यक्षपदाच्या निवडीसाठी शुक्रवारपासून मतदानाला सुरुवात झाली. ही मतदान प्रक्रिया तीन दिवस म्हणजे रविवारपर्यंत (ता.१७) चालणार आहे. सक्षम स्पर्धक नसल्याने या निवडणुकीत विद्यमान अध्यक्ष व्लादिमीर पुतीन (वय ७१) यांचा एकतर्फी विजय निश्‍चित असल्याचे मानले जात आहे.

युक्रेन युद्ध, विरोधकांवर मात , प्रसारमाध्यमे व उजव्या विचारसरणीच्या गटांची मुस्कटदाबी आणि पुतीन यांचे राजकीय व्यवस्थेवर पूर्ण नियंत्रण या पार्श्वभूमीवर नव्या अध्यक्षांच्या निवडीसाठी संपूर्ण रशियातील नागरिक मतदानात सहभागी होत आहेत. युक्रेनमधील ज्या प्रदेशांवर रशियाने ताबा मिळविला आहे, तेथेही मतदान घेण्यात येत आहे. यंदाच्या निवडणुकीत प्रथमच ऑनलाइन मतदानाचा पर्याय देण्यात आला आहे. मतदानाला आज सुरुवात झाल्यानंतर मॉस्कोमधील काही वेळातच दोन लाखांहून अधिक नागरिकांनी ऑनलाइन मतदान केले, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.

पुतीन यांच्यासमोर आव्हानच नसल्याने ते आणखी सहा वर्षे रशियाचे अध्यक्ष असतील, असे मानले जात आहे. अध्यक्षपदाचा त्यांचा हा पाचवा कार्यकाळ असेल. पुतीन यांचे राजकीय विरोधक एक तर तुरुंगात आहेत किंवा परदेशात अज्ञातस्थळी आहेत. त्यांचे कट्टर विरोधक ॲलेक्सी नवाल्नी यांचा गेल्या महिन्यात गूढ मृत्यू झाला. निवडणुकीतील अन्य तीन उमेदवार हे पुतीन यांच्या तुलनेत कमकुवत आहेत.

Russia presidential elections latest update Voting  vladimir putin fifth term marathi news
Rahul Gandhi: राहुल गांधींचा ED-CBIला इशारा; म्हणाले, भाजप सरकार बदलेलं तेव्हा, मी गॅरंटी देतो...

खरे निरीक्षण करणे कठीण

पुतीन यांची रशियावरील पकड पाहता आणि मतदारांपुढे उमेदवारांचे पर्यायही नसल्याने ही निवडणूक मुक्त आणि निष्पक्ष होईल, अशी अपेक्षा निरीक्षकांना नाही. देशातील सुमारे एक लाख मतदान केंद्रांवर तीन दिवसांहून अधिक काळ मतदान सुरू असेल. मात्र याचे वास्तव निरीक्षण करणे कठीण आहे, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

Russia presidential elections latest update Voting  vladimir putin fifth term marathi news
K Kavitha Arrested by ED: केसीआर यांच्या कन्या के. कविता यांना ईडीकडून अटक; दिल्लीला होणार रवानगी

केरळमध्येही मतदानाचा उत्साह

तिरुअनंतपुरमधील वाणिज्य दूतावासात केंद्र

तिरुअनंतपुरम ः रशियात अध्यक्षपदासाठी शुक्रवारपासून मतदान सुरू झाले आहे. यासाठी रशियाच नाही तर जगातील अनेक देशांमधून मतदान होत आहे. भारतातही केरळमध्ये राहणाऱ्या रशियाच्या नागरिकांनी मतदान केले.

रशियातील या निवडणुकीसाठी तिरुअनंतपुरमधील रशियन हाऊस येथील रशियन फेडरेशनच्या मानद वाणिज्य दूतावासात खास मतदान केंद्र तयार केले आहे. रशियाचे मानद वाणिज्यदूत आणि रशियन हाउसचे संचालक रथिश नायर म्हणाले की, रशियाच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी मतदान प्रक्रिया आयोजित करण्याची रशियन फेडरेशनच्या वाणिज्य दूतावासाची ही तिसरी वेळ आहे. केरळमध्ये राहणारे रशियन नागरिक आणि रशियाहून येथे आलेल्या पर्यटकांसाठी ही सोय केली आहे. केरळमधील रशियन नागरिकांनी त्यांचे नवीन अध्यक्ष निवडण्याच्या प्रक्रियेत केलेल्या सहकार्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे.

चेन्नईतील वरिष्ठ वाणिज्य प्रतिनिधी सर्गे अझुरोव्ह म्हणाले, ‘‘आम्ही अध्यक्षीय निवडणुकीच्या चौकटीत प्राथमिक मतदानाचे आयोजन केले आहे. भारतात राहणाऱ्या रशियन नागरिकांना आम्ही निवडणूक प्रक्रियेत सहभागी होण्याची संधी देत आहोत.’’

अध्यक्षीय निवडणुकीसाठी मतदान करण्यासाठी व्यवस्था केल्याबद्दल रशियन हाऊस आणि वाणिज्य दूतावासाची आभारी आहे. येथे मतदानाला आलेले रशियन नागरिक एकतर भारतात कायमच्या वास्तव्यास आहेत किंवा पर्यटक आहेत.

उलिया, रशियन नागरिक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com