
जगावरचं कोरोनाचं संकट अद्याप संपलेलं नाही तोच आता माणसासमोर बर्ड फ्ल्यूचं नवं संकट येऊन ठाकलं आहे.
जगावरचं कोरोनाचं संकट अद्याप संपलेलं नाही तोच आता माणसासमोर बर्ड फ्ल्यूचं नवं संकट येऊन ठाकलं आहे. ताज्या वृत्तानुसार, बर्ड फ्ल्यूच्या H5N8 या नव्या विषाणूची रशियातील एका व्यक्तीला बाधा झाली आहे. जगातील हे पहिलिचं उदाहरण असून जागतिक आरोग्य संघटनेनं (WHO) याबाबत जगाला अलर्ट केलं आहे.
रशियाच्या आरोग्य अधिकारी अन्ऩा पोपोआ यांनी शनिवारी सांगितलं की, "आमच्या वैज्ञानिकांना बर्ड फ्ल्यू विषाणूच्या H5N8 या नव्या स्ट्रेनचा मानवामध्ये संसर्ग झाल्याचं आढळून आलं आहे. यानंतर WHO ला माहिती देण्यात आली आहे."
बर्ड फ्ल्यूचा हा नवा प्रकार वेगानं संक्रमित होणारा असून पक्षांसाठी तो जीवघेणा आहे. मात्र, यापू्र्वी तो कधीही माणसामध्ये आढळून आला नव्हता. पोपोवा म्हणाल्या, "एका पोल्ट्री फार्ममध्ये काम करणाऱ्या सात कर्मचाऱ्यांमधून गोळा केलेला या नव्या विषाणूचा जनुकीय पदार्थ वैज्ञानिकांनी व्हिक्टर लॅबमध्ये विलगिकरणात ठेवला आहे. या ठिकाणी डिसेंबरमध्ये बर्ड फ्ल्यूचा फैलाव झाला होता."
पोपोआ पुढे म्हटल्या, "या कर्मचाऱ्यांमध्ये हा विषाणू आढळून आला असला तरी त्यांच्या प्रकृतीवर अद्याप कोणताही गंभीर परिणाम दिसून आलेला नाही. मात्र, या नव्या स्ट्रेनचा शोध महत्वपूर्ण असून हीच वेळ हे सांगू शकेल की विषाणू म्यूटेट करता येईल का. कारण हा विषाणू अशा वेळी सापडला आहे ज्यावेळी यामध्ये अद्याप मानवी शरिरात संक्रमण करण्याची क्षमता तयार झालेली नाही. त्यामुळे या संभाव्य म्युटेशिन विरोधात रशियासह जगाला तयारी करण्यासाठी वेळ मिळेल"
भारत India