खुशखबर! रशियाने कोरोना लशी संबंधी डेटा दिला भारताला; तिसऱ्या टप्प्यातील चाचणी सुरु होणार?

सकाळ न्यूज नेटवर्क
Monday, 7 September 2020

रशियाची कोरोना  लस russia corona vaccine प्रभावी असल्याचा दावा करण्यात आला आहे.

नवी दिल्ली- रशियाची कोरोना  लस russia corona vaccine प्रभावी असल्याचा दावा करण्यात आला आहे. विशेष म्हणजे लॅसेटने रशियाची लस पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यातील मानवी चाचणीमध्ये सुरक्षित आणि दुष्परिणामविरहित आढळल्याचे प्रसिद्ध केलं आहे. त्यामुळे रशियाच्या कोरोना लशीकडून अपेक्षा वाढल्या आहेत. त्यातच रशियाने कोरोना लशीची सुरक्षितता आणि त्याच्या प्रभावीपणा संबंधातील माहिती भारताला दिल्याचं कळतंय. एका इंग्रजी वृत्तसंस्थेने यासंदर्भातीत बातमी दिली आहे. 

एमपीएससीचे सुधारीत वेळपत्रक जाहीर; वाचा, केव्हा होणार परीक्षा? 

वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितलं की, मॉस्को स्थित गमालिया इन्स्टिट्यूटकडून Gamaleya Research Institute of Epidemiology and Microbiology कोविड-१९ लशी संबंधातील सर्वसमावेशक माहिती भारताला देण्यात आली आहे. रशियाच्या लस ७९ लोकांना देण्यात आली होती. पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यातील मानवी चाचणीत लस कोरोनाविरोधात लढण्यासाठी शरीरात समाधानकारक प्रतिकारशक्ती निर्माण करत असल्याचं सांगण्यात आलं आहे. 

रशियाची कोरोना लस भारतात बनवण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत, असं बॉयोटेक्नॉलिजी विभागाचे सचिव रेणू स्वरुप म्हणाले. रशियाने कोविड लशीसंबंधी दिलेल्या माहितीचा भारतात अभ्यास करण्यात येत आहे. त्यानंतर स्पुटनिक v लशीसाठी नियामक मंडळाकडून परवानगी घेतली जाईल. सर्व काही सुरळीत झालं तर या लशीची तिसऱ्या टप्प्यातील चाचणी भारतात सुरु करण्यात येणार आहे.

रशियाच्या अधिकृत स्पुटनिक v वेबसाईटनुसार, रशिया कोरोना लशीचे तिसऱ्या टप्प्यातील परिक्षण अनेक देशांमध्ये घेण्याचा विचार करत आहे. सौदी अरेबिया, संयुक्त अरब अमिराती, ब्राझील, फिलिपिन्स आणि भारतामध्ये हे परिक्षण पार पाडण्याची रशियाची योजना आहे. रशियाच्या कोरोना लशीचे उत्पादन सप्टेंबरपासून सुरु होणार आहे. स्पुटनिक V लशीसाठी भारतासह अन्य २० देशांनी रस दाखवल्याचं सांगण्यात येत आहे. 

'Y' दर्जाची सुरक्षा दिल्याबद्दल कंगनाने मानले गृहमंत्री अमित शहांचे...

रशियाने अत्यंत कमी काळात लस बनवल्याचा दावा केला असल्याने पश्चिमी तज्ज्ञ याबाबत संशय घेत आहेत. लॅसेंटच्या अभ्यासात सांगण्यात आलंय की, स्पुटनिक V चे तिसऱ्या टप्प्यातील परिक्षण जगभरातील ४० हजार स्वयंसेवकांवर करण्यात येणार आहे. शिवाय ऑनलाईन अॅप्लिकेशनच्या माध्यमांतून या स्वयंसेवकांवर लक्ष ठेवले जाणार आहे. 

दरम्यान, रशियाच्या वैज्ञानिकांनी ४ सप्टेंबर रोजी लॅसेंटमध्ये कोरोना लशी संदर्भात शोधनिबंध प्रसिद्ध केला. यात लस दोन्ही टप्प्यातील परिक्षणामध्ये यशस्वी ठरल्याचा दावा करण्यात आला आहे. तसेच डोस देण्यात आलेल्या स्वयंसेवकांच्या शरीरात कोणतेही दुष्परिणाम दिसले नसल्याचं सांगण्यात आलंय.

(edited by- kartik pujari)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Russia shares data on vaccine with India one option is Phase 3 trials here