esakal | रशियाने चोरली कोव्हिशिल्डची ‘ब्लूप्रिंट’IVaccine
sakal

बोलून बातमी शोधा

Vladimir Putin

रशियाने चोरली कोव्हिशिल्डची ‘ब्लूप्रिंट’

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

लंडन (वृत्तसंस्था) ः ऑक्सफर्डच्या ॲस्ट्रॅझेनेका कंपनीच्या कोरोना प्रतिबंधक कोव्हिशिल्ड लस निर्मितीचा आराखडा (ब्लूप्रिंट) रशियाने चोरला आणि त्यानंतर त्यांनी ‘स्पुटनिक’ लस तयार केली, असा खळबळजनक आरोप ब्रिटनने केला आहे. लस विकसित होत असताना रशियाचा एक गुप्तहेर त्याठिकाणी उपस्थित होता. त्यानेच ऑक्सफर्डच्या लशीचे तंत्रज्ञान रशियाला दिले, असा दावाही केला आहे.

हेही वाचा: चीनची भारताला धमकी; युद्ध झालं तर हाराल

ब्रिटनच्या संरक्षण विभागातील सूत्रांनी हा दावा केला आहे. स्पुटनिक लस तयार करण्यासाठी रशियासाठी काम करणाऱ्या गुप्तहेरांनी ‘ॲस्ट्रॅझेनेका’तून कोव्हिशिल्डची ‘ब्लूप्रिंट’ चोरली याचे पुरावे, असल्याची माहिती या सूत्रांनी मंत्र्यांना दिली आहे. ‘द सन’ या दैनिकाने प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार विदेशी गुप्तहेराने ही ‘ब्लूप्रिंट’ आणि कोव्हिशिल्डसंदर्भातील महत्त्वाची माहिती चोरली आहे. रशियाच्या ‘स्पुटनिक व्ही’ या लशीचा डोस काही महिन्यांपूर्वी घेतल्याचा दावा रशियाचे अध्यक्ष व्लादिमिर पुतीन यांनी केला असताना लशीच्या ‘ब्लूप्रिंट’ चोरीचा आरोप ब्रिटनने केला आहे.

कोरोनाचे संकट संपुष्टात आणण्यासाठी जनतेने लस घेण्याचे आवाहन पुतीन यांनी रशियाच्या जनतेला केले होते. ‘द सन’ने म्हटले आहे की, मॉस्कोत झालेल्या लशीच्या दोन वैद्यकीय चाचणीचे निष्कर्ष ब्रिटनमधील प्रतिष्ठीत नियतकालिक ‘द लॅन्सेट’मध्ये सप्टेंबर महिन्यात प्रसिद्ध झाले होते. रशियाची लस सुरक्षित व प्रभावी असल्याचे संकेत त्यातून दिले आहेत. ज्या तंत्राचा वापर ऑक्सफर्डच्या लशीत केला आहे, त्याचाच वापर ‘स्पुटनिक’मध्ये केला आहे, असेही म्हटले आहे.

७६ लोकांवर चाचण्या

लस दिल्यानंतर प्रतिकारशक्ती वाढल्याचे, गंभीर दुष्परिणाम न झाल्याचे रशियाच्या शास्त्रज्ञांनी सांगितले. लशीच्या फार कमी चाचण्या झाल्या असून रशियातील लाखो लोकांसाठी त्या पुरेशा नाहीत, असा इशारा देत पाश्‍चिमात्त्य शास्त्रत्रांनी म्हटले आहे की, रशियामधील चाचण्या केवळ ७६ लोकांवर झाल्या आहेत. त्यातील निम्म्यांनाच विषाणूरोधक लस प्रत्यक्षात टोचली आहे, असा दावाही या शास्त्रज्ञांनी केला आहे.

loading image
go to top