आमच्या कामात ढवळाढवळ करु नका; रशियाने अमेरिकेला सुनावलं

कार्तिक पुजारी
Wednesday, 8 July 2020

रशियामधील माध्यम स्वातंत्र्य धोक्यात आहे, असं ट्विट रशियातील अमेरिकेच्या राजदूत रेबेका रोस यांनी केलं होतं. यावर रशियाने तिखट प्रतिक्रिया दिली असून 'तुम्ही तुमच्या कामाकडे लक्ष द्या' असं म्हणत

मॉस्को- रशियामधील माध्यम स्वातंत्र्य धोक्यात आहे, असं ट्विट रशियातील अमेरिकेच्या राजदूत रेबेका रोस यांनी केलं होतं. यावर रशियाने तिखट प्रतिक्रिया दिली असून 'तुम्ही तुमच्या कामाकडे लक्ष द्या' असं म्हणत अमेरिकी दुतावासाला सुनावलं आहे. त्यामुळे दोन्ही देशांमध्ये वाद-विवाद सुरु झाल्याचं दिसत आहे.

मोठी बातमी! वॅक्सीन शिवाय कोरोनाला हरवण्यासाठी वैज्ञानिकांनी लावला मोठा शोध
एकानंतर एक रशियामधील पत्रकारांना अटक होत आहे. रशिया पूर्णपणे माध्यम स्वातंत्र्यावर गदा आणताना दिसत आहे, असं ट्विट रशियातील अमेरिकेच्या राजदूत  रेबेका रोस यांनी केलं होतं. यामुळे रशियाला चांगलीच मिर्ची लागल्याचं दिसत आहे. रशियाने तात्काळ याला प्रत्युत्तर दिलं आहे. तुम्ही तुमचं काम बगा (mind your own business),असं ट्विट रशियन परराष्ट्र मंत्रालयाने केलं आहे. 

सोव्हियत काळातील केजीबीचे नवीन रुप एफएसबी सुरक्षा संस्थेने रशियातील प्रतिष्ठित पत्रकार इवान सफरोनोव(30) यांना अटक केली आहे. त्यांच्यावर देशद्रोहाचा आरोप ठेवण्यात आला आहे. सफरोनोव  यांच्या अटकेमुळे त्यांचे समर्थक आणि पत्रकार वर्गामध्ये संताप आहे. रशियाच्या संरक्षण क्षेत्राचे वार्तांकन केल्यामुळे त्यांना अटक करण्यात आल्याचा आरोप त्यांच्याकडून होत आहे.  

संरक्षण दलातील अधिकारी येवगेनी स्मिरनोव यांनी कॉमरसॅट वृत्तपत्राच्या पत्रकाराने झेक रिपब्लिकसाठी हेरगिरी केल्याचा आरोप केला आहे. तसेच झेक गुप्तहेर अमेरिकेसाठी काम करत असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे. सफरोनोव यांनी रशियन लष्कर, संरक्षण शस्त्रास्त्र याबाबत गोपनीय माहिती गोळा केल्या असल्याचा आरोप एफएसबीने केला आहे.

अकोल्यात सरासरी एक कोरोना बळी, तीन महिन्यांत 90 मृत्यू
रशियाकडून सुरक्षेच्या नावाखाली अनेक पत्रकारांना अटक केली जात आहे. मागे एका पत्रकाराला दहशतवादाचे समर्थन केल्याचा आरोप करत 7 हजार डॉलरचा दंड ठोठावण्यात आला होता. तसेच त्याला शिक्षाही सुनावण्यात आली होती.

रशियातील सर्व टेलिव्हिजन संस्था सरकारच्या नियंत्रणाखाली आहेत. प्रिंट आणि ऑनलाईन व्यासपीठावर काम करणाऱ्या अनेक पत्रकारांनी अभिव्यक्ती स्वातंत्र्याची मुस्काटदाबी होत असल्याचा आरोप केला आहे. तसेच क्रेमलीनकडून माध्यमावंर दबाव वाढत असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Russia tells america to mind own business