Russia-Ukraine Ceasefire: रशिया अन् युक्रेन यांच्यात युद्धविराम सुरू... डोनाल्ड ट्रम्प यांच्या पत्नीची महत्त्वाची भूमिका

Russia-Ukraine Ceasefire Begins in Oleshky : मेलानिया ट्रम्प यांच्या मध्यस्थीने रशिया-युक्रेन युद्धादरम्यान ओलेश्की शहरात मर्यादित युद्धविराम लागू झाला. नागरिकांना मानवतावादी मदत पोहोचविण्यासाठी सुरक्षित मार्ग उपलब्ध होणार आहे.
Melania Trump plays a key mediating role in a limited Russia-Ukraine ceasefire in Oleshky to facilitate humanitarian aid for civilians

Melania Trump plays a key mediating role in a limited Russia-Ukraine ceasefire in Oleshky to facilitate humanitarian aid for civilians

esakal

Updated on: 

रशिया आणि युक्रेन यांच्यात सुरू असलेल्या युद्धादरम्यान दक्षिण युक्रेनमधील रशियाच्या ताब्यात असलेल्या ओलेश्की शहरात मर्यादित युद्धविराम लागू करण्यात आला आहे. अमेरिकेच्या प्रथम महिला मेलानिया ट्रम्प यांच्या मध्यस्थीने झालेल्या करारानुसार, २७ ऑक्टोबर २०२६ रोजी हा युद्धविराम अंमलात आला. नागरिकांचे संरक्षण करणे आणि युद्धग्रस्त भागात आवश्यक मानवतावादी मदत पोहोचविण्यासाठी सुरक्षित मार्ग उपलब्ध करून देणे, हा या निर्णयामागील प्रमुख उद्देश आहे. मात्र, दोन्ही देशांमधील संपूर्ण युद्ध थांबलेले नसून इतर भागांत लष्करी कारवाया सुरूच आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com