'पुतीन यांना फोन करणार नाही'; युक्रेनवरील हल्ल्याबाबत रशिया-अमेरिकेत बाचाबाची

joe biden
joe bidenjoe biden america us

न्यूयॉर्क : उपग्रहांद्वारे काढलेल्या नव्या छायाचित्रातून बेलारूस क्रिमिया व पश्‍चिम रशियात सैनिकी हालचाली वाढत असल्याचे दिसत आहे. त्यामुळे सैन्य माघारी परतत असल्याचा रशियाचा दावा फोल ठरला आहे. मॅक्सर या उपग्रह छायाचित्रे पुरविणाऱ्या अमेरिकेतील खासगी कंपनीच्या उच्च प्रतीची छायाचित्रांमध्ये प्रिपयात नदीवर बेलारूस ते युक्रेन (Ukraine) सीमेवरील सहा किलोमीटरपेक्षा कमी अंतराचा एक नवा सैनिकी पूल उभारल्याचे दिसत आहे. ही छायाचित्रे गेल्या ४८ तासांत काढलेली आहे. दुसरीकडे युक्रेनवर हल्ल्याबाबत अमेरिका आणि रशियामध्ये (Russia) बाचाबाची होताना दिसत आहे. (Russia Ukraine crisis)

joe biden
कोरोना म्हणजे 133 वर्षांनंतर परतलेला 'रशियन फ्लू'?

आता अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी या साऱ्या प्रकरणावर आपलं मत मांडलं आहे. त्यांनी म्हटलंय की, रशियाकडून युक्रेनवर 'पुढील काही दिवसांत' हल्ला होणं शक्य आहे. मात्र, पुतीन यांना फोन करण्याची सध्यातरी 'कोणतीही योजना नाही', असं जो बायडेन यांनी म्हटलंय. एएफपीने यांदर्भात वृत्त दिलं आहे. मात्र, रशियाच्या परराष्ट्र मंत्रालयाने याबाबत खुलासा केला आहे. रशिया युक्रेनवर कोणत्याही प्रकारचा हल्ला करण्याची योजना आखत नसल्याचं स्पष्टीकरण दिलं आहे.

दुसरीकडे, रशिया सैन्य माघारी घेत असल्याचा कोणताही पुरावा अद्याप दिसत नसल्याने आपण त्यांच्यावर विश्‍वास ठेवण्याची घाई करू नये, असे आवाहन ब्रिटनच्या परराष्ट्र मंत्री लिझ ट्रस यांनी आज केले. अमेरिकेनेही आज पुन्हा एकदा रशियाकडून आक्रमण होण्याचा धोका व्यक्त केला आहे.

सैन्य माघारी घेत असल्याची घोषणा रशियाने केली असतानाही त्यांच्यावर विश्‍वास ठेवण्यास ब्रिटन आणि अमेरिका तयार नाही. रशियाच्या सैन्य तैनातीबाबत बोलताना लिझ ट्रस म्हणाल्या की, ही ‘नाटो’ संघनेसाठीची लिटमस चाचणी आहे. रशिया सैन्य माघारी घेत असल्याचे दिसलेले नाही. त्यामुळे त्यांच्यावर विश्‍वास ठेवता येणार नाही. ‘रशियाकडून कोणत्याही क्षणी युक्रेनवर आक्रमण होऊ शकते,’ हा इशारा ‘व्हाइट हाऊस’ने आज पुन्हा एकदा दिला आहे. तसेच, रशियाविरोधात जगाची एकजूट करण्यासाठी जर्मनीतील म्युनिच येथे होणाऱ्या जागतिक परिषदेला उपाध्यक्षा कमला हॅरिस आणि परराष्ट्र मंत्री अँटनी ब्लिंकन यांना पाठविणार असल्याची घोषणाही अमेरिकेचे अध्यक्ष ज्यो बायडेन यांनी केली आहे. सैन्य माघारी घेणे सोडाच, रशियाने आणखी सात हजार सैन्य सीमेवर तैनात केले असल्याचा दावाही अमेरिकेने केला आहे.

joe biden
गर्भावस्थेत लस घेतल्यास अर्भकाचे संरक्षण अधिक, अभ्यासात स्पष्ट

भारताची साथ अमेरिकेलाच मिळावी

रशियाने युक्रेनवर हल्ला केल्यास आंतरराष्ट्रीय नियमांच्या पालनासाठी बांधिल असलेल्या भारताची साथ अमेरिकेलाच असेल, असा विश्‍वास अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते नेड प्राइस यांनी आज व्यक्त केला. नेड म्हणाले की,‘‘ऑस्ट्रेलियामध्ये नुकत्याच झालेल्या क्वाड परिषदेत युक्रेन प्रश्‍नावर चर्चा झाली. हा प्रश्‍न राजनैतिक मार्गानेच सोडविण्याबाबत आणि आंतरराष्ट्रीय नियमांच्या पालनाबाबत भारतासह सर्वांचे एकमत झाले. मोठे देश लहान देशांवर दडपण आणू शकत नाहीत.’’

युक्रेन - भारत विमान सेवेवरील निर्बंध शिथिल

रशिया व युक्रेनमध्ये तणाव कायम असून भारत सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीयांची सुटका करण्याठी विमान वाहतुकीवरील प्रतिबंध तात्पुरच्‍या स्वरूपात हटविण्याचा निर्णय नागरी हवाई वाहतूक मंत्रालयाने आज घेतला. युक्रेनमध्ये अडकलेले भारतीय विद्यार्थी व कर्मचाऱ्यांना मायदेशी आणण्यासाठी भारत व युक्रेनमधील उड्डाणांची व आसन क्षमतेवर लावलेले प्रतिबंध हटविण्यात आले आहेत. खासगी विमानांनाही परवानगी दिली आहे, असे मंत्रालयाने एका निवेदनाद्वारे जाहीर केले. मागणी मोठी असल्याने फेऱ्यांची संख्या वाढविण्याचे निर्देश एअर इंडियाला दिले आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com