Russia | रशियाने उचलले कठोर पाऊल, अमेरिकन कंपनीवर केली कारवाई | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Vladimir Putin

Russia | रशियाने उचलले कठोर पाऊल, अमेरिकन कंपनीवर केली कारवाई

युक्रेनवर हल्ले सुरुच आहेत. या दरम्यान रशियाने गुगल विरोधात मोठा निर्णय घेतला आहे. युक्रेन युद्धाबाबत खोट्या बातम्या पसरवल्याचा आरोप करत रशियात गुगल वृत्त सेवेवर (Google News Service) बंदी घातली आहे. गुगलने काही दिवसांपूर्वी अॅप्स आणि युट्यूबसाठी रशियातील आपले अॅडव्हर्टायझिंग बिझनेस बंद केले आहे. त्यास रशियाने या कारवाईने प्रत्युत्तर दिले आहे. गूगल न्यूज विरोधात सदरील कारवाई रशियाच्या (Russia) दूरसंचार नियामकाने केली आहे. अल् जजीराने आपल्या एका वृत्तात म्हटले आहे, की अल्फाबेट इंकच्या गुगलचे न्यूज अॅग्रिगेटर सेवा बंद केली जात असल्याचे रशियाने सांगितले. (Russia Ukraine Crisis Google News Banned In Russia)

हेही वाचा: अमेरिकेकडून भारताला मोठी ऑफर, पंतप्रधान मोदी घेणार का पुढाकार?

दूरसंचार नियामकाने आरोप केला आहे, की गुगल युक्रेनमध्ये रशियन लष्करी मोहिमेविषयी खोट्या बातम्या देत आहे. गुगलने म्हटले की काही लोकांना रशियात गुगल न्यूज अॅप आणि संकेतस्थळांवर जाण्यास अडचणी येत आहेत. हे तांत्रिक बिघाडामुळे घडत नाही. आम्ही रशियातील लोकांसाठी बातम्या आणि माहिती देण्यासाठी खूप परिश्रम घेतले आहे. रशियातील अॅप्स आणि यूट्यूब चॅनल्सला जाहिराती मिळण्यासाठी मदत करणार नाही.

हेही वाचा: व्लादिमीर पुतीन यांना विष देऊन मारण्याचा कट, १००० कर्मचाऱ्यांना केले बडतर्फ

या व्यतिरिक्त गुगलने (Google) या महिन्यात सुरुवातीला घोषणा केली होती, की रशियात सर्व ऑनलाईन जाहिरातींच्या विक्रीवर बंदी घातली जाईल. ब्लूमबर्गने आपल्या वृत्तात सांगितले, की गुगलला भिती होती की रशियन सरकारकडून कारवाई होऊ शकते. त्यामुळे अगोदरपासून याबाबत कंपनी तयारीला लागली होती.

Web Title: Russia Ukraine Crisis Google News Banned In Russia

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top