Russia Ukraine Conflict : युक्रेनच्या राजधानीत शुकशुकाट, सायरनचा आवाज... | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Russia Ukraine Conflict

Russia Ukraine Conflict : युक्रेनच्या राजधानीत शुकशुकाट, सायरनचा आवाज...

किव्ह : युद्धाच्या भीतीमुळे एका शहरात शुकशुकाट होतो आणि मानवी संस्कृती प्रभावित होते. याचे जिवंत उदाहरण म्हणजे युक्रेनची राजधानी किव्ह आहे. रशियाच्या हल्ल्यांच्या भीतीने लोक वेगाने पलायन करित आहेत. विकेण्ड कर्फ्यू सोमवारी सकाळी संपताच लोक रेल्वेस्थानकांकडे धावू लागले आहे. जास्तीचे भाडे मोजून कोणी वाहनांनी स्थानकावर पोचत होते. दुसरीकडे अशी कुटुंब होती जी बॅग्स ओढत पायी जात होते. किव्हमध्ये वारंवार सायरन वाजत आहे. प्रशासनाचे म्हणणे आहे, की लोकांनी घरांमध्ये थांबावे किंवा पुन्हा सुरक्षित ठिकाणी जावे. गेल्या आठवड्याच्या सुरुवातीपर्यंत ३० लाखांची लोकसंख्या असलेल्या किव्ह (Kyvi) शहरातील जनजीवन सामान्य होते. (Russia Ukraine Update Kyvi Under Air Under Raid Sirens)

हेही वाचा: Russia-Ukraine War: युक्रेनच्या मुद्द्यावर PM मोदींनी घेतली उच्चस्तरीय बैठक

मात्र आज प्रत्येकाला आपला जीव वाचवण्याची चिंता आहे. युरोपातील सातवे सर्वात मोठे शहर आज युद्धाच्या छायेत आहे. या दरम्यान युक्रेनचे (Ukraine) राष्ट्रपती व्होलोदिमीर झेलेंस्की म्हणाले, की आमचा प्रत्येक नागरिक हा सैनिक असुन रशियाला (Russia) सडेतोड उत्तर मिळेल. आम्ही रशियाचे साडेचार हजार सैनिकांना आतापर्यंत मारले आहे. या व्यतिरिक्त मोठ्या संख्येत रणगाडे, हेलिकाॅप्टर आणि इतर साहित्याचेही नुकसान झाले आहे.

हेही वाचा: Ukraine| मायभूमीसाठी युक्रेनच्या नागरिकांचा अमेरिकेत मोर्चा

आज रात्री रशिया करु शकतो किव्हवर मोठा हल्ला

युक्रेनच्या लष्कराचे म्हणणे आहे, की रशियाचे किव्हवर नियंत्रण मिळविण्याचे सर्व प्रयत्न फसले आहेत. या दरम्यान रशियाने प्रत्यक्ष किव्हच्या रहिवाशांना इशारा दिला आहे.रशियन प्रसारमाध्यमांकडून सांगितले जाते की त्यांनी शहर सोडून सुरक्षित ठिकाणांवर जावे. सूत्रांचे म्हणणे आहे, की जर बेलारुसमध्ये सध्या सुरु असलेले युक्रेन आणि रशियाची वार्ता अपयशी झाली तर पुढचा दिवस फार कठिण असेल. सूत्रांनुसार वार्ता अपयशी ठरल्यास किव्ह शहरावर रशियाकडून मोठा हल्ला आज रात्री होऊ शकतो. मोठ्या प्रमाणावर बाॅम्ब वर्षाव केला जाऊ शकतो. (Russia Ukraine War)

Web Title: Russia Ukraine Update Kyvi Under Air Under Raid Sirens

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..