युक्रेन धुमसतंय; खार्किवमध्ये गॅस पाईपलाइन, ऑइल डेपोवर क्षेपणास्त्र हल्ले

Ukraine
Ukraine
Summary

रशियाने (Russia) आक्रमक भूमिका घेतली असून युक्रेनमधील (Ukraine) काही शहरेही ताब्यात घेतली आहेत.

किव : रशिया आणि युक्रेन यांच्यातील संघर्ष चौथ्या दिवशीही सुरुच आहे. रशियाने (Russia) आक्रमक भूमिका घेतली असून युक्रेनमधील (Ukraine) काही शहरेही ताब्यात घेतली आहेत. आता त्यांनी खार्किवमधील (Kharkiv) गॅस पाईपलाइन उडवली आहे. त्याचवेळी त्यांनी वासिल्किवमधील ऑइल डेपोवरही रशियाने बॅलेस्टिक मिसाइलने हल्ला केला आहे.

राजधानी किवच्या चारही बाजूने रशिया हल्ला करत आहे. रात्री ९ वाजल्यापासून दोन मोठे स्फोट किवमध्ये घडवून आणण्यात आले आहेत. किवजवळ असलेल्या रेडिओअॅक्टिव वेस्ट डिस्पोजल साइटवर एअरस्ट्राइक करण्यात आला. दरम्यान, कोणत्याही प्रकारचे लीकेज झाले नसल्याची माहिती समोर आलेली नाही.

अमेरिकेतील एका खासगी कंपनीने सॅटेलाइट फोटो शेअर केले आहेत. यात दावा करण्यात आला आहे की, युक्रेनमध्ये मोठ्या प्रमाणावर रशियाने ताबा मिळवला आहे. रशियाने युक्रेनमधील नोवाकाखोवकातील नीपर नदीजवळ त्यांचे लष्कर एकत्र केले आहे.

Ukraine
'तिसरं महायुद्ध टाळण्यासाठी रशियावर...'- ज्यो बायडेन

रशियन सैन्याने शनिवारी तिसऱ्या दिवशीसुद्धा युक्रेनमधील अनेक शहरांवर आर्टिलरी आणि क्रूझ क्षेपणास्त्रांचा मारा केला. युक्रेनचे राष्ट्रपती व्लोदोमीर झेलेन्स्की यांनी राजधानी किव युक्रेनच्याच ताब्यात असल्याचं सांगितलं. शनिवारी पहाटेच्या सुमारास किव शहरात तोफ आणि गँड मिसाइलचा मारा करण्यात आल्याचे आणि स्फोटाचे आवाज झाले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com