अखेर चीन उतरला रशियाच्या मदतीला, अमेरिकेने केलाय विरोध | China Russia Relation | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Russia And China

अखेर चीन उतरला रशियाच्या मदतीला, अमेरिकेने केलाय विरोध

युक्रेनवर रशियाचे हल्ले सुरुच आहेत. मात्र त्याचा फटका रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांना बसला आहे. युद्धाला आज मंगळवारी (ता.१५) २० दिवस झाले आहेत. तरी ही युक्रेनियन सैन्य आणि नागरिक हरलेले नाहीत. त्यांचा रशियाविरुद्ध लढा सुरुच आहे. आणखीन किती दिवस हे युद्ध सुरु राहिल हे सांगत येत नाही. मात्र रशियाला (Russia) आता शस्त्रसाठ्याची टंचाई जाणवू लागली आहे. मग संकटाच्या वेळी जगातील दोन महासत्ता एकत्र आल्या आहेत. रशियाने चीनकडे मदतीची मागणी केली होती. (Russia Ukraine War China Will Provide Money And Weapons To Russia)

हेही वाचा: कोरोनाची दहशत ! चीनच्या सर्वात श्रीमंत व्यक्तीला ५ अब्ज डाॅलरचा फटका

त्यास चीनने (China) होकार दिला आहे. रशियाला चीन पैसा आणि शस्त्रास्त्रे पुरवणार आहे. दुसरीकडे मदत केल्यास चीनला परिणामांना सामोरे जावे लागेल, असा इशारा अमेरिकेने (America) दिला होता. असे असतानाही चीन रशियाच्या मदतीसाठी पुढे आला आहे. मात्र अमेरिकेची भूमिका काय असेल याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. युक्रेनवरील (Ukraine) हल्ल्याच्या अगोदर रशियाने चीनबरोबर एक करार केला होता.

हेही वाचा: Ukraine Russia War: रशियाच्या हल्ल्यांचे क्षेत्र विस्तारले

त्यानुसार चीनने रशियाचा गहू खरेदी करण्याची तयारी दाखवली होती. अमेरिका आणि ब्रिटनमधील संरक्षणविषयक तज्ज्ञांनी रशियाकडे १० ते १४ दिवस पुरेल एवढाच शस्त्रसाठा असल्याचा दावा केला आहे. शस्त्रसाठा संपत असताना युक्रेनमध्ये रशियन सैन्य पुढे जाऊ शकणार नाही.

Web Title: Russia Ukraine War China Will Provide Money And Weapons To Russia

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..