Russia Ukraine War l मध्य-पूर्वेतील देशांवर संकट; भारताकडून मागितली मदत | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

PM Narendra Modi

Russia Ukraine War l मध्य-पूर्वेतील देशांवर संकट; भारताकडून मागितली मदत

रशिया-युक्रेन (Russian Ukraine War) युद्धाचा परीणाम हळूहळू सर्वंच ठिकणी जाणवू लागला आहे. याचा सर्वात मोठा फटका मध्यपूर्वेतील अनेक देशांना बसला आहे. या भागातील बहुतांश देश हे रशिया आणि युक्रेनकडून गहू खरेदी करतात. परंतु युद्धामुळे या देशांना गव्हाचा पुरवठा थांबला आहे. रशिया आणि युक्रेनकडून अन्नधान्य खरेदी करणाऱ्या देशांमध्ये लेबनॉनचाही (Lebanon) समावेश आहे. या देशाने आता भारताकडे मदतीचे आव्हान केले आहे.

हेही वाचा: Goa Sex Racket l मुंबईतील टीव्ही अभिनेत्रीसह तिघींची सुटका

तुर्कीच्या वृत्तसंस्थेनुसार, लेबनॉनचे अर्थव्यवस्था आणि व्यापार मंत्री अमीन सलाम यांनी लेबनॉनमधील भारताचे राजदूत डॉ. सोहेल एजाज खान यांची भेट घेतली आहे. या भेटीदरम्यान त्यांनी रशियन हल्ल्यामुळे उद्भवलेल्या अन्न संकटात लेबनॉनला भारताने मदत करावी अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.

या बैठकीनंतर लेबनॉनच्या अर्थ मंत्रालयानेही एक निवेदन जारी केले आहे. यामध्ये भारताकडे गव्हाचा पुरेसा साठा असून तो लेबनॉनला पाठवण्यात येईल असे भारताचे राजदूत डॉ. सोहेल एजाज खान यांनी सांगितले आहे. तसेच युक्रेनच्या संकटानंतर निर्माण झालेल्या अन्न संकटाचा सामना करण्यासाठी अमीन सलाम यांनी सोहेल खान यांची त्यांच्या कार्यालयात भेट घेतल्याचे नमूद केले आहे.

लेबनॉनवर आलेले हे संकट दूर करण्यासाठी अमीन सलाम यांनी भारतासह तुर्कीच्या राजदूतांचीही भेट घेतली आहे. लेबनॉनला दर महिन्याला ५० हजार टन गहू खरेदी करावा लागतो. इतक्या मोठ्या प्रमाणात गव्हाचा साठा उपलब्ध होण्यासाठी लेबनॉन सरकार प्रयत्न करत आहे.

Web Title: Russia Ukraine War Impact Lebanon Wheat Crisis Amin Salan Meet In Sohail Khan

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..