Russia Ukraine War : रशियाचा भारतीय कंपनीच्या औषध प्रकल्पावर ड्रोन हल्ला; एकाचा मृत्यू, मोठे नुकसान

रशियाने युक्रेनमधील सुमी शहरातील भारतीय कुसुम ग्रुपच्या औषध निर्मिती प्रकल्पावर ड्रोन हल्ला केला.या हल्ल्यात एका व्यक्तीचा मृत्यू झाला असून अनेकजण जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे.
Russia Drone Attack on Kusum Group Plant in Sumy

Russia Drone Attack on Kusum Group Plant in Sumy

esakal

Updated on: 

रशिया-युक्रेन युद्धादरम्यान युक्रेनमधील भारतीय कंपनीच्या औषध निर्मिती प्रकल्पावर रशियाने ड्रोन हल्ला केल्याची माहिती समोर आली आहे. सुमी शहरातील कुसुम ग्रुपच्या औषध निर्मिती प्रकल्पाला या हल्ल्याचा मोठा फटका बसला. या हल्ल्यात एका व्यक्तीचा मृत्यू झाला असून अनेकजण जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे. प्रकल्पाच्या मुख्य इमारतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. हल्ल्यानंतर परिसरातून धुराचे लोट उठताना दिसून आले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com