युक्रेननेच विद्यार्थ्यांना ओलीस ठेवलं; रशियाच्या दाव्यावर भारताचे उत्तर

Indian students stranded in Ukraine
Indian students stranded in Ukraine esakal

रशिया युक्रेन युध्दादरम्यान (Russia Ukraine War) हजारो भारतीय विद्यार्थी युक्रेनमध्ये अडकले आहेत. दरम्यान युद्धग्रस्त युक्रेनमध्ये अडकलेल्या आपल्या नागरिकांना बाहेर काढण्यासाठी भारताने आपले प्रयत्न वाढवत असताना, रशिया आणि युक्रेन या दोन्ही देशांकडून सुरक्षित मार्गासाठी विनंती सुरू केली आहे. या प्रक्रियेदरम्यान, रशिया आणि युक्रेनने एकमेकांवर भारतीय विद्यार्थ्यांना ओलीस ठेवल्याचे आरोप केले आहेत.

युक्रेनने भारतीय विद्यार्थ्यांना ओलीस ठेवल्याचा दावा रशियाने बुधवारी केला. रशियाच्या संरक्षण मंत्रालयाने सांगितले की, रशिया खारकिव्हमधून भारतीय विद्यार्थ्यांना बाहेर काढण्याचा प्रयत्न करत असताना युक्रेनच्या सैन्याने भारतीयांना ओलीस ठेवले होते.

मंत्रालयाच्या अधिकृत प्रतिनिधीने दिलेल्या निवेदनात, मेजर जनरल इगोर कोनाशेन्कोव्ह म्हणाले: "आमच्या डेटानुसार, खारकिव्हमध्ये युक्रेनियन अधिकारी युक्रेनियन प्रदेश सोडून बेल्गोरोडला जाऊ इच्छिणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांच्या मोठ्या गटाला जबरदस्तीने ताब्यात घेत आहेत." पुढे ते म्हणाले, "भारतीय नागरिकांच्या सुरक्षित स्थलांतरासाठी सशस्त्र सेना सर्व आवश्यक उपाययोजना करण्यास तयार आहेत. आणि त्यांना रशियाच्या हद्दीतून त्यांच्या लष्करी वाहतूक विमाने किंवा भारतीय विमानांसह मायदेशी पाठवावे, जसे भारतीय बाजूने प्रस्तावित आहे. "

Indian students stranded in Ukraine
युक्रेनमध्ये मुलगा गमावलेले वडील म्हणाले, '९७ टक्के गुण असूनही इथे…'

दरम्यान, युक्रेन MFA ने आरोप केला आहे की भारत, पाकिस्तान, चीन आणि इतर देशांतील विद्यार्थी "रशियन सशस्त्र आक्रमणाचे ओलिस बनले आहेत."

विशेष म्हणजे, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्यातील फोन कॉलनंतर रशियन मंत्रालयाचे हे विधान प्रसिद्ध झाले. पुतिन-मोदी यांच्यात संघर्षग्रस्त भागातून भारतीय नागरिकांना सुरक्षितपणे बाहेर काढण्याबाबत चर्चा झाली होती.

Indian students stranded in Ukraine
व्हॉट्सॲपचे 'हे' भन्नाट फीचर गुगल देतंय Gmail मध्ये, वाचा डिटेल्स

भारताचे म्हणणे काय?

या दरम्यान भारतीय नागरिकांना युक्रेनने ओलीस ठेवल्याच्या दाव्याबाबत भारत सरकारकडून उत्तर देण्यात आले आहे. युक्रेनमधील आमचा दूतावास युक्रेनमधील भारतीय नागरिकांच्या सतत संपर्कात आहे. आम्ही लक्षात घेतो की युक्रेनियन अधिकाऱ्यांच्या सहकार्याने काल अनेक विद्यार्थ्यांनी खारकिव्ह सोडले आहे. आम्हाला कोणत्याही विद्यार्थ्याबाबत कोणलाही ओलीस ठेवले असल्याची कोणताही रिपोर्ट मिळाला नसल्याचे परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने सांगितले आहे.

पंतप्रधान कार्यालयाच्या निवेदनानुसार मोदी पुतीन चर्चा झाली त्याबद्दल सांगण्यात आले होते की, "दोन्ही नेत्यांनी युक्रेनमधील परिस्थितीचा आढावा घेतला … त्यांनी संघर्षग्रस्त भागातून भारतीय नागरिकांना सुरक्षितपणे बाहेर काढण्याबाबत चर्चा केली. दरम्यान, केंद्रीय परराष्ट्र व्यवहार राज्यमंत्री व्ही मुरलीधरन यांनी सांगितले की, तब्बल 6000 भारतीयांना परत आणण्यात आले आहे. "युद्धग्रस्त युक्रेनमध्ये अडकलेल्या 20,000 भारतीयांपैकी 6,000 लोकांना आत्तापर्यंत देशात परत आणण्यात आले आहे आणि उर्वरित लोकांच्या सुरक्षित परतीसाठी केंद्र सर्व प्रयत्न करत आहे," असे त्यांनी पीटीआयशी बोलताना सांगितले.

Indian students stranded in Ukraine
Tata Nexon चे 4 नवीन व्हेरिएंट लॉंच, मिळणार हे मस्त फीचर्स, पाहा किंमत

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com