
इन्फोसिसनंतर 'टाटा स्टील'चा मोठा निर्णय; रशियासोबत बंद केला व्यवसाय
खासगी क्षेत्रातील कंपनी टाटा स्टीलने रशियासोबतचा व्यवसाय बंद करण्याची घोषणा केली आहे. रशिया-युक्रेन युद्धादरम्यान कंपनीने हे पाऊल उचलले आहे. टाटा स्टीलच्या आधी देशातील आघाडीची आयटी कंपनी इन्फोसिसनेही रशियासोबतचा व्यवसाय संपवण्याची घोषणा केली होती.
टाटा स्टील कंपनीच्या प्रवक्त्याने सांगितले कीस, टाटा स्टीलचे रशियामध्ये कोणतेही काम नाही किंवा तेथे कर्मचारीही नाहीत. आम्ही काळजीपूर्वक विचार करून रशियासोबतचा व्यवसाय बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. टाटा स्टीलने सांगितले की, व्यवसायात सातत्य राखण्यासाठी कंपनीच्या भारत, यूके आणि नेदरलँडमधील सर्व स्टील उत्पादन कारखान्यांनी कच्च्या मालाच्या पर्यायी पुरवठ्याची व्यवस्था केली आहे.
हेही वाचा: पीडितेशी लग्नानंतर बलात्काराच्या आरोपीची कोर्टाकडून निर्दोष सुटका
यामुळे त्यांचे रशियावरील अवलंबित्व संपुष्टात आले आहे. कंपनीने तिच्या विविध कामांसाठी रशियाकडून मर्यादित प्रमाणात कोळसा खरेदी केला आहे. अलीकडेच इन्फोसिसने रशियासोबतचा व्यवसाय संपवण्याची घोषणा केली. पाश्चात्य मित्र राष्ट्रांनी भारताला युद्धाविरोधात बोलण्याचे आवाहन केले आहे. तसेच अनेक पाश्चात्य कंपन्यांनी देखील रशियात व्यवसाय बंद केले आहेत.
हेही वाचा: भारतातील टॉप सहा सर्वाधिक मायलेज देणाऱ्या कार, पाहा यादी
Web Title: Russia Ukraine War Tata Steel To Stop Doing Business With Russia
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..