
Russia-Ukraine War: रशियाविरुद्ध युक्रेनचा 'मास्टरप्लॅन'
सध्या युक्रेन आणि रशियात जोरदार युद्ध सुरु असून यामध्ये युक्रेनचे मोठे नुकसान झाले आहे. रशियाने युक्रेनवर हल्ला केला असून या युद्धाला आता पाच दिवस झाले आहेत. या युद्धाचे पडसाद जागतिक पातळीवर हळूहळू पहायला मिळत आहेत. युक्रेनच्या खारकीव आणि खेरसन या भागात रशियाने पुन्हा मिसाईल हल्ले केले आहेत. या हल्ल्यात युक्रेनची मोठी जिवीत आणि वित्तहानी झाली आहे. (Russia-Ukraine War Updates)
सध्या युक्रेनमध्ये भारताचे खूपजण अडकले असून त्यापैकी बहुतांश विद्यार्थी आहेत. त्यांच्यामध्ये सध्या भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. भारताकडून अडकलेल्या भारतीयांना मदत करणं सुरुच आहे पण काही निर्बंधामुळे अडचणी येत असल्याचं सांगितलं जातंय. तसेच युक्रेनकडूनसुद्धा हल्ल्याला जोरदार प्रत्युत्तर देणं सुरु आहे. रशियाचे जवळपास ४३०० सैनिक मारले गेल्याचा दावा युक्रेनने केला आहे. तसेच त्यांच्या हल्ल्यात युक्रेनचे ११६ मुलं आणि १६८४ नागरिक जखमी झाल्याचं सांगितलं. जिवितहानीबद्दल कोणतीही माहीती युक्रेनकडून देण्यात आलेली नाही.
या पार्श्वभुमीवर युरोपीय देशांनी रशियावर आणि त्यांच्या ऊत्पादनावर निर्बंध घातले. यानंतर रशियाने युक्रेनच्या अधिकाऱ्यांशी बोलण्याची सहमती दर्शवली. सध्या बेलारुसच्या गोमेल शहरात ही बैठक सुरु आहे. यादरम्यान युक्रेनकडून एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. युक्रेनने रशियाशी दोन हात करण्यासाठी लष्कराची एक नवीन तुकडी तयार करण्याचा निर्णय घेतला आहे. जीचं नाव International Legion असं असणार आहे. या लष्कराच्या तुकडीत इतर देशांचे लोकसुद्धा सहभागी होऊ शकतात असं युक्रेनच्या संरक्षण मंत्रालयानं सांगितलं. जे रशियाला तोंड देण्यासाठी आमच्यासोबत येऊ इच्छित आहेत आशा नागरिकांकडून अर्ज मागवण्यात येत असल्याचही त्यांनी म्हटलं आहे.
सध्या अमेरिकेसह अनेक देशांनी रशियावर आर्थिक निर्बंध लादले आहेत. त्याचबरोबर २८ देशांनी रशियाविरोधात लढण्यासाठी निर्णय घेतला आहे. तसेच बऱ्याच देशांनी युक्रेनला लष्करी मदत देण्यास सुरुवात केली आहे. त्याचबरोबर युक्रेनने हे लष्करी युनिट स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे.
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी हे युनिट तयार करण्याचा निर्णय घेतला असून या मोहिमेत परदेशी नागरिकसुद्धा सहभागी होऊ शकतात आणि त्यासाठी लोकांकडून अर्ज येत आहेत. सध्या हजाराहून अधिक अर्ज आले असल्याचं युक्रेनच्या परराष्ट्र मंत्रालयाने सांगितलं.
Web Title: Russia Ukraine War Ukraine New Unit Army Decision
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..