युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींचा पळून जाण्यास नकार

Russia Ukraine War: युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींचा पळून जाण्यास नकार
Ukraine President Volodymyr Zelenskiy Refuse to Leave Capital Kyiv
Ukraine President Volodymyr Zelenskiy Refuse to Leave Capital Kyivesakal

कीव्ह: युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वलोडिमिर झेलेन्स्की (Volodymyr Zelenskiy) यांनी आज (दि. 25) राजधानी कीव्ह (Kyiv) सोडण्यास स्पष्ट नकार दिला. त्यांनी मी आणि माझे कुटुंबीय दोन्ही कीव्हमध्येच आहोत असे सांगितले. झेलेन्स्कींनी युक्रेनचे लष्कर राजधानी कीव्हकडे कूच करणाऱ्या रशियाला सडेतोड (Russia Ukraine War) उत्तर देत असल्याचेही सांगितले. (Ukraine President Volodymyr Zelenskiy Refuse to Leave Capital Kyiv)

Ukraine President Volodymyr Zelenskiy Refuse to Leave Capital Kyiv
Ukraine Russia War Live : राजधानी कीव्हमध्ये स्फोट, अणुभट्टीवर रशियाचा ताबा

आपल्या व्हिडिओ संदेशात झेलेन्स्की म्हणाले की, 'शत्रूने मला प्रमुख टार्गेट केले आहे. त्यानंतर माझे कुटुंबीय त्यांच्या रडावर असतील. त्यांना युक्रेनच्या प्रमुखाला उद्ध्वस्त करून राजकीय दृष्ट्या नेस्तनाभूत करायचं आहे. मी राजधानीतच राहणार आहे. माझे कुटुंबीय देखील युक्रेनमध्येच आहेत.'

युक्रेनचे राष्ट्राध्यांनी सध्या तरी आपण अखेरपर्यंत रशियाच्या आक्रमणाचा प्रतिकार करणार असल्याचे बोलून दाखवले आहे. त्यांनी अफगाणिस्तानचे माजी राष्ट्रपती अशरफ घनी यांचासारखे आपल्या जनतेला वाऱ्यावर सोडून देण्याचा निर्णय घेतलेला नाही. अफगाणिस्तानात तालिबान काबूलवर चाल करून गेले त्यावेळी घनींनी राजधानीतून पळ काढला होता.

Ukraine President Volodymyr Zelenskiy Refuse to Leave Capital Kyiv
Ukraine Russia War: आम्हाला युद्धात एकटं पाडलं: युक्रेन राष्ट्राध्यक्ष

रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादीमीर पुतीन (Vladimir Putin) यांनी युक्रेनचे सरकार त्यांच्याच लोकांविरूद्ध नरसंहार सुरू करण्याची शक्यता वर्तवून विशेष लष्करी मोहिम सुरू केली. याचबरोबर त्यांनी युक्रेन हे अनधिकृत राष्ट्र असून ऐतिहासिकदृष्ट्या ते रशियाचाच भाग आहे असाही दावा केला.

अमेरिका आणि युक्रेनच्या अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार रशियाचा मुख्य उद्येश हा राजधानी कीव्ह ताब्यात घेऊन सरकार पाडणे हा आहे. पुतिन युक्रेनच्या विद्यमान सरकारला अमेरिकेच्या तालावर नाचणारे सरकार म्हणून संबोधते. रशियाच्या लष्कराने नुकतेच कीव्हच्या उत्तरेला असलेल्या बंद पडलेली चर्नोबेल अणुभट्टी ताब्यात घेतली आहे. हा मार्ग राजधानी कीव्हपर्यंत पोहचण्याचा एक शॉर्टकट आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com