
Russia-Ukraine War: रशिया आणि युक्रेनमध्ये सुरू असलेल्या युद्धादरम्यान रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी दोन दिवसांसाठी युद्धविरामाचे आदेश दिले आहेत. म्हणजेच गुरुवारी (6 जानेवारी) आणि शुक्रवारी (7 जानेवारी) युद्धविराम असणार आहे.
एएफपी या वृत्तसंस्थेनुसार, ऑर्थोडॉक्स ख्रिसमसच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे. पुतिन यांनी अध्यात्मिक गुरू पॅट्रिआर्क किरिल (Patriarch Kirill) यांच्या विनंतीवरून हा निर्णय घेतला आहे. युक्रेनमध्ये हा युद्धविराम 6 जानेवारीच्या दुपारपासून 7 जानेवारीच्या मध्यरात्रीपर्यंत 36 तास चालेल. त्याचवेळी युक्रेनने याला ढोंगीपणा असल्याचे म्हटले आहे.
युक्रेनने काय म्हटलेय?
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की यांचे सल्लागार मायखाइलो पोडोल्याक (Mykhailo Podolyak) यांनी ट्विट केले, सर्वप्रथम, युक्रेनने कोणत्याही परदेशी भूमीवर हल्ला केला नाही किंवा नागरिकांची हत्या केली नाही. आमच्या सैन्याने फक्त सैनिकांना मारले आहे. रशियाने प्रथम आमची व्यापलेली जमीन सोडली पाहिजे. ही हिप्पोक्रेसी तुमच्याकडेच ठेवा.
रशियन राष्ट्राध्यक्षांच्या कार्यालयाने दिलेल्या माहितीनुसार, अध्यात्मिक गुरू पॅट्रिआर्क किरिल ( Patriarch Kirill ) यांच्या विनंतीनंतर संरक्षण मंत्र्यांना युद्धबंदीचे आदेश देण्यात आले आहेत. रशिया आणि युक्रेनमध्ये जवळपास वर्षभरापासून युद्ध सुरू आहे. या लढ्यात अमेरिका, ब्रिटन, फ्रान्ससह अनेक देशांनी उघडपणे युक्रेनला पाठिंबा दिला आहे.
त्याचवेळी या देशांच्या आघाडीच्या विरोधात पुतिन सातत्याने आक्रमक धोरण स्वीकारत आहेत. मात्र, ऑर्थोडॉक्स ख्रिसमसच्या पार्श्वभूमीवर त्यांनी दोन दिवस युद्धविराम जाहीर केला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.