
युक्रेनचे अध्यक्ष वोलोडिमीर झेलेन्स्की यांनी रशिया-युक्रेन युद्ध थांबवण्यासाठी नवीन प्रस्ताव ठेवला आहे. त्यांनी सुचवले की, युक्रेनच्या ज्या भागांवर अद्याप कीवचे नियंत्रण आहे, त्या भागांना नाटोच्या संरक्षणछत्राखाली आणले जावे. अशा पद्धतीने युद्धाला पूर्णविराम लागू शकतो, असे त्यांनी सांगितले.