'फिनलंड NATO चा सदस्य झाला तर...', रशियाचा गंभीर इशारा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Russia Warned Finland

'फिनलंड NATO चा सदस्य झाला तर...', रशियाचा गंभीर इशारा

मॉस्को : पूर्व युरोपीय देश फिनलंड (Finland) नाटोमध्ये (NATO) होणार असल्याच्या घोषणेवर रशिया संतापला आहे. फिनलंडच्या घोषणेनंतर काही तासांतच क्रेमलिनने एक निवेदन जारी करून इशारा दिला आहे. फिनलंडचे नाटोमध्ये सामील होणे हा रशियासाठी थेट धोका असल्याचे निवेदनात म्हटले आहे. एवढेच नाही तर रशियानेही याला प्रत्युत्तर म्हणून कारवाईची धमकी दिली आहे.

हेही वाचा: रशिया-युक्रेन युद्ध काळात भारतीय शेतकरी जगाला मदत करतोय : कृषी मंत्री

फिनलंडची रशियाला लागून 1,300 किमीची सीमा आहे. शीतयुद्ध काळापासून फिनलंडने ऐतिहासिकदृष्ट्या तटस्थता राखली आहे. परंतु युक्रेनवरील आक्रमण आणि झपाट्याने बदलणारी भू-राजकीय परिस्थिती पाहता पंतप्रधान सना मरिन यांनी नाटोमध्ये सामील होण्याची घोषणा केली आहे. देश नॉर्थ अटलांटिक ट्रीटी ऑर्गनायझेशन (NATO) मध्ये सामील होण्याच्या प्रस्तावाला समर्थन देत आहे. सध्या प्रक्रिया सुरू असून पुढील काही दिवसांत फिनलँड नाटोचा सदस्य होऊ शकतो. याशिवाय शेजारचा स्वीडनही येत्या काही दिवसांत नाटोमध्ये सामील होण्याचा निर्णय घेऊ शकते.

रशियानं काय म्हटलं? -

फिनलँडचे नाटोमध्ये सामील होणे हा मोठा धोका आहे, असं रशियानं म्हटलं आहे. रशियन सरकारच्या मुख्यालयाच्या क्रेमलिनचे प्रवक्ते दिमित्री पेस्कोव्ह म्हणाले की, उत्तर अटलांटिक करार संघटना (नाटो) रशियाच्या सीमेजवळ पायाभूत सुविधा विकसित केली तर रशिया त्याला प्रत्युत्तर देईल. रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी रशियाच्या सीमेवर नाटोच्या विस्ताराला प्रतिसाद म्हणून पश्चिम भागात देशाची सुरक्षा बळकट करण्याच्या सूचना दिल्या आहेत. स्वीडन आणि फिनलंडने नाटोमध्ये सामील होण्याचा निर्णय घेतल्यास लष्करी आणि राजकीय परिणाम भोगावे लागतील, असा इशारा यापूर्वी रशियाने दिला होता.

रशिया फिनलंडवर त्वरित कारवाई करणार नाही!

रशिया अद्याप फिनलंडला पूर्ण नाटो सदस्यत्व मिळण्याची प्रतीक्षा करेल. फिनलंडमध्ये नाटो आपली लष्करी ताकद वाढवत आहे, असे रशियाला वाटत असेल, तर निश्चितच प्रत्युत्तर देईल, असंही रशियाकडून सांगण्यात आलं आहे.

Web Title: Russia Warned Finland Not To Member Of Nato

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :RussiaFinland
go to top