रशियाकडून पहिल्या कोविड-19 लसीची निर्मिती; वाचा स्वयंसेवकांवर कशी केली गेली चाचणी

कार्तिक पुजारी
सोमवार, 13 जुलै 2020

रशियाच्या विद्यापीठाने कोविड-19 वरील लस तयार केल्याचा दावा केला आहे. लस प्रभावी ठरल्यास ही जगातील पहिली कोरोना विषाणूवरील लस ठरणार आहे.

मॉस्को- रशियाच्या विद्यापीठाने कोविड-19 वरील लस तयार केल्याचा दावा केला आहे. लस प्रभावी ठरल्यास ही जगातील पहिली कोरोना विषाणूवरील लस ठरणार आहे. विद्यापीठाने या वैद्यकीय चाचणीची पूर्ण प्रक्रिया कशी पार पाडण्यात आली, याबाबतची माहिती आपल्या वेबसाईटवर दिली आहे. 18 जूनपासून या लसीची चाचणी सुरु झाली होती. रशियाच्या गमालेया इन्स्टिट्यूट ऑफ एपिडेमिओलॉजी आणि मायक्राबायोलॉजीने या कोविड-19 वरील लसीचे निर्माण केले आहे. 20 जूलैला कोविड-19 च्या स्वयंसेवकांनी घरी सोडण्यात येईल अशी माहिती विद्यापीठाने दिली आहे. रशियन मंत्रालयाने 16 जून रोजी या लसीच्या चाचणीला हिरवा कंदील दाखवला होता. 

COVID-19 पार्टी जीवावर बेतली; चूक कळली पण..
लसीच्या वैद्यकीय चाचण्या कशा पार पडल्या ते आपण पाहुया

- 19 जून रोजी 18 निरोगी स्वयंसेवकांना लस देण्यात आली.
- दूसऱ्या गटातील 20 स्वयंसेवकांना 23 जून रोजी इंटरव्हेंशनल कार्डियोव्हॉसोलॉजीसाठी प्रॅक्टिकल रिसर्च सेंटर येथे लस देण्यात आली. 
- लस देण्यात आलेले पुरुष आणि महिला स्वयंसेवक 18 ते 65 वयोगटातील होते
- लस दिल्यानंतर काही स्वयंसेवकांमध्ये डोकेदुखी आणि शरिराचे तापमान वाढल्याचे जाणवले, पण 24 तासानंतर स्वयंसेवकांमध्ये कोणतीही लक्षणे दिसून आली नाहीत.
-या काळात प्रत्येक स्वयंसेवकाला सेचेनोव्ह विद्यापीठात एकटे-एकटे ठेवण्यात आले होते.
- इंजेक्शनच्या माध्यमातून लस दिल्यानंतर सर्व स्वयंसेवकांना 28 दिवस विलगीकरणात ठेवण्यात आले होते. याकाळात त्यांना इतर कोणता आजार होऊ नये याची काळजी घेण्यात आली. घरी सोडल्यानंतरही किमान 6 महिने त्यांच्या तब्येतीवर लक्ष ठेवण्यात येणार आहे.
- विलगीकरणात असताना स्वयंसेवकांना मानसिक आधार देण्यात आला होता.
-गमालेया इन्स्टिट्यूटमध्ये तयार झालेली कोविड-19 च्या लसीची मोस्कोतील ब्रुडेनो लष्करी रुग्णालयातही चाचणी घेण्यात आली आहे.
-लष्करी रुग्णालयाने लसीच्या वैद्यकीय चाचणीसाठी द्रव माध्यमाचा वापर केला आहे.

राजस्थानमध्ये सत्ताबदल होणार? 'या' आहेत तीन शक्यता
सेचेनोव विद्यापीठातील इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल पॅरासिटॉलॉजी, ट्रॉपिकल अॅण्ड वेक्टर-बोर्न डिसिज विभागाचे संचालक अलेक्झांडर लुकाशेव यांच्या म्हणण्यानुसार, अभ्यासाच्या या टप्प्याचे उद्दिष्ट म्हणजे मानवी आरोग्यासाठी ही लस सुरक्षित ठरली आणि त्याची यशस्वी चाचणीही झाली. सध्या बाजारात असलेल्या लसींपेक्षा ही लस अधिक सुरक्षित असल्याचेही लुकाशेव यांनी रशियन वृत्तसंस्था स्पुतनिकशी बोलताना सांगितले. 

लसीच्या विकास आणि उत्पादनाबाबत निर्मात्यांनी धोरणे आधीच ठरविलेली आहेत. मात्र, ही जागतिक महामारी लक्षात घेता त्याचे उत्पादन तोकडे पडेल, असेही लुकाशेव यांनी यावेळी स्पष्ट केले.
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Russian claims successful trials of worlds first Covid-19 vaccine