
रशियामध्ये एक प्रवासी विमान क्रॅश झाले विमानाने ५० प्रवाशांसह उड्डाण केले होते, परंतु उड्डाणानंतर विमानाचा एअर ट्रॅफिक कंट्रोल (एटीसी) शी संपर्क तुटला. अंगारा एअरलाइन्सचे विमान चीनच्या सीमेवरील अमूर प्रदेशातील टिंडा शहराजवळ बेपत्ता झाले होते. विमान त्याच्या लँडिंग स्पॉटजवळ होते, परंतु अचानक हवाई वाहतूक नियंत्रणाच्या रडार स्क्रीनवरून गायब झाले. आता ते क्रॅश झाल्याचा व्हिडिओ समोर आला आहे.