युक्रेन युद्धामुळे पुतीन बनले शक्तीशाली, रशियात लोकप्रियता वाढली

युक्रेन युद्धामुळे रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतीन यांची लोकप्रियता पुन्हा एकदा वाढली आहे.
Vladimir Putin
Vladimir Putin esakal

माॅस्को : युक्रेन युद्धामुळे रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतीन यांची लोकप्रियता पुन्हा एकदा वाढली आहे. रशियात युक्रेन युद्धावरुन झालेल्या निदर्शनांदरम्यान सरकार संस्थेच्या वतीने करण्यात आलेल्या ताज्या सर्वेक्षणात ६५ टक्के रशियन नागरिकांनी पुतीनचे युक्रेनमध्ये सुरु असलेल्या विशेष लष्करी अभियानाला आपली मान्यता दिली आहे. एवढेच नव्हे दुसऱ्या एका स्थानिक सर्वेक्षणात ७१ टक्के लोकांनी पुतीनवर विश्वास व्यक्त केला आहे. युक्रेन (Ukraine) युद्ध सुरु होण्यापूर्वी पुतीन यांच्यावर रशियन नागरिकांचा विश्वास ६० टक्के होता. सेंट पीटर्सबर्ग येथील टॅक्सीचालकाने एशिया टाईम्सशी बोलताना म्हणाले, जे काही पुतीन करित आहेत, ते योग्य आहे. युक्रेनने आमच्यासाठी कोणताच पर्याय सोडला नव्हता. आम्हाला डोनत्स भागातील नरसंहार थांबवायचा होता. (Russian President Vladimir Putin Popularity Increases After Ukraine Attack)

Vladimir Putin
विमानाने ७ तासांत होणाऱ्या प्रवासास लागले दहा दिवस, अबोली परतली मायदेशी

एकीकडे पाश्चात्य देश रशियाचे (Russia) युक्रेनवर होत असलेल्या हल्ल्यांचा निंदा करित आहे. रशियन राष्ट्रपतींना या लष्करी अभियानाला आपल्या देशातील एक मोठ्या जनसमुदायाची साथ मिळत आहे. रशियन राष्ट्रपती कार्यालयाचा दावा आहे, की पुतीन विशेष लष्करी अभियान चालवून युक्रेनची फॅसिवादी सरकारकडून तेथील जनतेला मुक्त करण्याचे काम करित आहे.

रशिया, युद्धाची सुरुवात करत नाये

रशियाची जनता क्रेमलिनच्या या दाव्याचे समर्थन करताना दिसत आहे. रशियाच्या सरकारी संस्थेकडून करण्यात आलेल्या सर्वेक्षणात युक्रेनमधये कारवाई करुन रशिया डोनत्स भागात रशियन भाषा बोलणाऱ्या जनतेची संरक्षण करित असल्याचा खुलासा करण्यात आला आहे. रशियाच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्या मारिया जखरोवा म्हणाल्या, रशिया युद्धाची सुरुवात करत नाही. तो ते संपवत आहे. यामुळेच पुतीन यांची लोकप्रियता युद्धानंतर ६० टक्क्यांवरुन वाढून ७१ टक्क्यांपर्यंत पोहोचली आहे. यापूर्वी क्रिमियाला युक्रेनपासून वेगळे करण्याच्या दरम्यानही रशियात व्लादिमीर पुतीन (Vladimir Putin) यांची लोकप्रियता खूप वाढली होती.

Vladimir Putin
रशिया-युक्रेन युद्धामुळे स्टील दर तेजीत

त्यावेळी ही रशियाकडून क्रिमियाची रशियन जनतेची किव्हच्या सरकारपासून संरक्षण करणे आवश्यक आहे. या नंतर रशियन जनता देशाचा झेंडा हातात घेऊन रस्त्यांवर उतरली होती आणि पुतीन यांची लोकप्रियता वाढली होती. युक्रेन युद्धाचा आज १४ वा दिवस आहे. दोन्ही देशांमध्ये शस्त्रसंधीवरुन आपापल्या भूमिकेत शिथलता दिसत आहे. युक्रेनचे राष्ट्रपतींनी घोषणा केली आहे, की त्यांचा देश नाटोची सदस्यत्व घेणार नाही. रशियाची ही प्रमुख मागणी होती.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com