
S. Jaishankar Trying to Attack by Khalistani: भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांच्या वाहनावर लंडनमध्ये खलिस्तानी समर्थकांनी हल्ल्याचा प्रयत्न केला आहे. एका चर्चेसाठीच्या बैठकीनंतर 'कॅथनम हाऊस' इथून बाहेर पडत असताना हा प्रकार घडला. यावेळी त्यांचा ताफा अडवण्याचा प्रयत्न करणाऱ्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. तसंच लंडन पोलिसांसमोरच त्यांनी भारताचा राष्ट्रध्वज फाडला.