आंदोलनकर्त्याच्या हाती देशाची सूत्रे 

पीटीआय
Tuesday, 12 January 2021

झापोरोव्हा यांनी २०१७ मध्ये आंदोलन करताना देशातील एका राज्याच्या राज्यपालाचे अपहरण केले होते आणि त्याबद्दल त्यांना तुरुंगवासाची शिक्षाही झाली होती. मात्र, यामुळे ते जनतेमध्ये लोकप्रिय झाले होते. 

मॉस्को - किरगिझस्तानच्या अध्यक्षांची सत्ता उलथवून टाकण्यसाठी गेल्या वर्षी निदर्शने केलेल्या आणि त्यासाठी तुरुंगवास भोगलेल्या नेत्याची देशाच्या अध्यक्षपदी निवड झाली आहे. काल (ता. १०) झालेल्या निवडणूकीत मतदारांनी सादीर झापोरोव्ह यांच्या पदरात ७९ टक्के मतांचे दान टाकत त्यांच्याकडे प्रचंड बहुमताने सत्ता सोपविली. या विजयामुळे राज्यघटनेत बदल करून अध्यक्षांना अधिक अधिकार देण्याच्या झापोरोव्ह यांच्या भूमिकेलाही जनतेने संमती दिली आहे. 

देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

गेल्या वर्षीच्या निवडणुकीत तत्कालीन सूरोन्बाइ जीन्बेकोव्ह सरकारला पाठिंबा असणाऱ्या पक्षांनी विजय मिळविल्यानंतर विरोधकांनी गैरप्रकार झाल्याचा आरोप केला होता. त्यामुळे जीन्बेकोव्ह यांना १५ ऑक्टोबरला राजीनामा द्यावा लागला होता. झापोरोव्हा यांनी २०१७ मध्ये आंदोलन करताना देशातील एका राज्याच्या राज्यपालाचे अपहरण केले होते आणि त्याबद्दल त्यांना तुरुंगवासाची शिक्षाही झाली होती. मात्र, यामुळे ते जनतेमध्ये लोकप्रिय झाले होते. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sadyr Zhaparov is presidential elections in Kyrgyzstan