Air India : एअर इंडियाच्या विमानचं रशियात इमर्जन्सी लँडिंग; अमेरिका म्हणते, आम्ही बारकाईने लक्ष ठेवून | San Francisco to Delhi Air India flight | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

San Francisco-bound Air India flight  diverted to Russia US says closely monitoring situation

Air India : एअर इंडियाच्या विमानचं रशियात इमर्जन्सी लँडिंग; अमेरिका म्हणते, आम्ही बारकाईने लक्ष ठेवून

दिल्लीहून अमेरिकेतील सॅन फ्रान्सिस्कोकडे जाणारे एअर इंडियाचे विमान AI173 च्या इंजिनमध्ये बिघाड झाल्याचा प्रकार मंगळवारी घडला. यानंतर पायलटने ताबडतोब रशियाच्या मगदान विमानतळाशी संपर्क साधत विमान तिकडे वळवण्याची परवानगी मागितली. यानंतर विमान सुरक्षितरित्या रशियात उतरवण्यात आलं. यावर अमेरिकेने आम्ही सर्व घडामोडींवर बारकाइने लक्ष ठेवून असल्याचे म्हटले आहे.

खाजगी विमान कंपनी एअर इंडियाने काल संध्याकाळी सांगितलं की दिल्लीहून उड्डण केलेलं विमान एआय१७३ इंजिनमध्ये बिघाड झाल्याने मंगळवारी रुस येथील मगदानकडे वळवण्यात आलं. या विमानात २१६ प्रवासी आणि १६ क्रू मेंमर होते आणि विमान सुरक्षितरित्या उतरवण्यात आलं.

अमेरिकेला जाणारे विमान ज्याला रशियामध्ये इमर्जन्सी लँडिंग करावे लागले याबद्दल विदेश विभागाचे प्रवक्ते वेदांत पटेल म्हणाले की आम्हाला त्याबद्दल माहिती आहे. आम्ही परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहोत. पटेल यांना विमानात किती अमेरिकन नागरिक होते असे विचारले असता त्याची पुष्टी मी सध्या करू शकत नाही असे उत्तर त्यांनी दिलं.

ते पुढे म्हणाले की, विमानाने अमेरिकेत येण्यासाठी उड्डाण केले होते. त्यामुळे त्यात अमेरिकेचे नागरिकही असण्याची शक्यता नक्कीच आहे. एअर इंडियाशी सातत्याने चर्चा सुरू असल्याचे ते म्हणाले. पटेल म्हणाले की, प्रवाशांसाठी आणखी एक विमान उपलब्ध करून दिले जात असल्याचे मला समजते.

७ जूनला पर्यायी विमान निघणार

मगदान ते सॅन फ्रान्सिस्कोला पर्यायी फ्लाइटची व्यवस्था केली जाईल. या विमानातून AI173 चे सर्व प्रवासी आणि क्रू रवाना होतील. सर्वजण सध्या मगदानमधील स्थानिक हॉटेलमध्ये थांबले आहेत. प्रवाशांना लवकरात लवकर इच्छित स्थळी सुरक्षितपणे पोहोचता यावे यासाठी तेथील अधिकारी पूर्ण सहकार्य करत आहेत.

टॅग्स :IndiausaRussiaAir India