Sharad Pawar : भीमा-कोरेगाव प्रकरणी फडणवीसांची चौकशी व्हावी का? शरद पवार स्पष्टच म्हणाले…

Devendra Fadanvis & Sharad Pawar
Devendra Fadanvis & Sharad Pawar Sakal

Bhima Koregaon Case: पुण्यातील भीमा-कोरेगाव येथे २०१८ साली झालेल्या दंगली प्रकरणी देवेंद्र फडणवीसांच्या चौकशीची मागणी करण्यात आली आहे.

वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी भीमा-कोरेगाव आयोगासमोर सुरू असलेल्या चोकशीला तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना बोलवण्याची मागणी केलीय. यामागणीवर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांनी भाष्य केलं आहे.

भीमा कोरेगाव दंगली प्रकरणी राष्ट्रवादी कांग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची चौकशी करण्यात आली होती, यानंतर आता प्रकाश आंबेडकर यांनी तत्कालिन गृहमंत्री देवेंद्र फडणीस यांना देखील चौकशीसाठी बोलवा अशी मागणी केली आहे. यावर पवारांना छत्रपती संभाजीनगर येथे झालेल्या पत्रकार परिषदेत प्रश्न विचारण्यात आला.

पवार काय म्हणाले?

देवेंद्र फडणवीस त्या काळात गृहमंत्री होते त्यामुळे त्यांची या प्रकरणात चौकशी व्हावी का? यावर शरद पवार म्हणाले की, आयोगाला वाटेल यांची चौकश होणं आवश्यक आहे त्यांनी त्याला बोलवावं. त्यांनी मला बोलवलं मी गेलो. मी दोन दिवस चौकशीसाठी गेलो असेही शरद पवार म्हणाले.

Devendra Fadanvis & Sharad Pawar
Sharad Pawar : हे घडवलं जातंय! संगमनेर, कोल्हापूरच्या घटनांवरून पवारांचा सत्ताधाऱ्यांवर गंभीर आरोप

असाच ट्रेंड राहिला तर चित्र बदलेल…

पुढे बोलताना देशातील सध्याचा ट्रेंड भाजपविरोधी असल्याचे शरद पवार म्हणाले.देशाचा नकाश समोर ठेवा. आपण केरळ पासून सुरूवात करू तिथं भाजप नाही. कर्नाटक, तेलंगणा, आंध्र प्रदेश मध्ये नाही. गोव्यात नव्हती पण आमदार फोडून राज्य आणलं. महाराष्ट्र बाजूला ठेवा गुजरातमध्ये आहे आपण मान्य करू.

त्यानंतर मध्यप्रदेशात कमलनाथ मुख्यमंत्री होते, तेथे आमदार फोडले आणि राज्य आणलं. यूपीत आहे, बाकी झारखंड, छत्तीसगढ हिमाचल दिल्ली पंजाब, प.बंगाल इथं भाजप नाही.

त्यामुळे राज्यात लोकांनी बदल करण्याची भूमिका घेतल्याचं दिसतंय. हा ट्रेंड लोकसभेला राहिला तर देशात वेगळं चित्र बघायला मिळेल हे सांगायला ज्योतिष्याची गरज नाही असेही शरद पवार म्हणालेत.

Devendra Fadanvis & Sharad Pawar
Sharad Pawar : शिवछत्रपतींनी कधी भोसल्यांचं राज्य केलं नाही, तर…; पवारांनी संभाजी ब्रिगेडच्या सोहळ्यात व्यक्त केली भावना

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com