

saudi arebia
esakal
Saudi Arabia: पश्चिम आशियातील वाढत्या भू-राजकीय तणावाच्या आणि युद्धाच्या सावटादरम्यान, सौदी अरेबियाने मदिना प्रांतात तब्बल ११० दशलक्ष टन कच्च्या खनिजांचा प्रचंड साठा शोधून काढल्याची महत्त्वपूर्ण घोषणा केली आहे. या साठ्यामध्ये मोठ्या प्रमाणावर युरेनियम आणि दुर्मिळ खनिजे आढळल्याचे सौदी अरेबियाचे ऊर्जामंत्री प्रिन्स अब्दुल अझीझ बिन सलमान यांनी स्पष्ट केले आहे.