esakal | सौदी अरेबियाकडून भारताला दिवाळीची खास भेट
sakal

बोलून बातमी शोधा

saudi arebia diwali gift to india

"जी20' समुहाचे नेतृत्व सौदी अरेबियाकडे आहे. 21 व 22 नोव्हेंबर रोजी या समुहाची परिषद होणार आहे. त्यानिमित्त सौदी अरेबियाने 20 रियालची (सौदी चलन) विशेष नोट छापून तिचे अनावरण केले.

सौदी अरेबियाकडून भारताला दिवाळीची खास भेट

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

लंडन - भारताशी मित्रत्वाचे संबंध असलेल्या सौदी अरेबियाने दिवाळी भेट दिली आहे. नव्या नोटेवर जगाचा नकाशा छापण्यात आला असून त्यात पाकने आपल्या हद्दीत दाखविलेले पाकव्याप्त काश्‍मीर (पीओके) आणि गिलगीट-बाल्टीस्तान वगळण्यात आले.

पीओकेमधील कार्यकर्ते अमजद अयुब मिर्झा यांनी बुधवारी केलेल्या ट्‌विटमुळे हे स्पष्ट झाले. दिवाळी भेट असा उल्लेख त्यांनीच केला आहे. याचा संदर्भ असा की, "जी20' समुहाचे नेतृत्व सौदी अरेबियाकडे आहे. 21 व 22 नोव्हेंबर रोजी या समुहाची परिषद होणार आहे. त्यानिमित्त सौदी अरेबियाने 20 रियालची (सौदी चलन) विशेष नोट छापून तिचे अनावरण केले. त्यात पाकिस्तानच्या नकाशात वरील दोन भागांचा समावेश नाही.

हे वाचा - याला काय म्हणावं! फ्रान्समध्ये नाही पाकचा राजदूत; तरी त्याला परत बोलावण्याचा प्रस्ताव मंजूर

सौदी अरेबियाची ही कृती पाकिस्तान तसेच पंतप्रधान इम्रान खान यांच्यासाठी कलंक आहे, अशी प्रतिक्रियाही मिर्झा यांनी व्यक्त केली. इम्रान यांच्या सरकारने गिलगीट-बाल्टीस्तानमध्ये 15 नोव्हेंबर रोजी निवडणूक आयोजित केली आहे. यास भारताने तीव्र विरोध दर्शविला आहे. जम्मू-काश्‍मीर, लडाख व गिलगीट-बाल्टीस्तान हा आपला अविभाज्य भाग असल्याचा पुनरुच्चार परराष्ट्र खात्याने केला आहे.

दरम्यान, महिला पत्रकार व कार्यकर्त्या नायला इनायत यांनी यासंदर्भात इम्रान यांना टोला लगावला. सौदी अरेबियाचे युवराज महंमद बीन सलमान गेल्या वर्षी पाकिस्तान दौऱ्यावर आले होते. त्यावेळी इम्रान यांनी स्वतः मोटार चालवून त्यांना आपल्या अधिकृत निवासस्थानी आणले होते. त्याचा संदर्भ देत नायला यांनी ट्‌विट केले की, इम्रान हे महंमद बीन सलमान यांच्यासाठी ड्रायव्हर बनल्याची ही अशी फळे मिळाली आहेत.

loading image
go to top