

Israeli Intel Aid via US
esakal
Saudi Arabia Seeks: येमेनमध्ये हुती बंडखोरांच्या जोरदार हल्ल्यानंतर सौदी अरेबिया मोठ्या संकटात सापडला आहे. सुरक्षेच्या कारणास्तव सौदीने थेट इस्रायलकडे गुप्तचर मदतीची याचना केली आहे. हुती बंडखोरांनी लाल समुद्राचा किनारा आणि मोक्याच्या बाब अल-मंदेब सामुद्रधुनीवर ताबा मिळवल्यामुळे सौदी अरेबियाच्या तेल निर्यातीवर गंभीर संकट निर्माण झाले आहे. या कठीण प्रसंगी सौदी अरेबियाचा जुना मित्र आणि 'मक्का करारा'तील भागीदार असलेल्या पाकिस्तानने येमेन संघर्षात लष्करी हस्तक्षेप करण्यास नकार दिला.