

Saudi Arabia Helicopter Crash
ESakal
सौदी अरेबियामधून एक अत्यंत दुःखद आणि मोठी बातमी येत आहे. जगातील सर्वात मोठ्या तेल कंपन्यांपैकी एक असलेल्या सौदी अरामकोचे एक हेलिकॉप्टर रास तानुरा शहरात कोसळले आहे. या भीषण अपघातात किमान १४ जणांचा मृत्यू झाल्याचे वृत्त आहे. स्थानिक सरकारी वृत्तसंस्थेनुसार, हा अपघात रास तानुरा परिसरात घडला. कंपनीचे हेलिकॉप्टर अचानक कोसळून जमिनीवर पडले.