सौदी अरेबियाच्या नागरिकांना भारतात बंदी, अन्य 15 देशांचा समावेश | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Saudi Arebia

सौदी अरेबियाच्या नागरिकांना भारतात प्रवासाला बंदी, अन्य 15 देशांचा समावेश

सौदी अरेबिया : सौदी अरेबिया सरकारने कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे आपल्या नागरिकांना परदेशात प्रवास करण्यावर बंदी घातली आहे. सध्या कोरिया सहित अनेक देशांमध्ये कोरोनाचा प्रभाव वाढला आहे. सौदी अरेबियाने नागरिकांना भारतासहित इतर पंधरा देशांमध्ये प्रवासावर बंदी घालण्यात आली आहे.

(Saudi Arabia Banned Foreign Country Travel For Citizen)

भारताव्यतिरिक्त सौदीच्या नागरिकांना ज्या देशांमध्ये प्रवास करण्यास मनाई करण्यात आली आहे त्यात लेबनॉन, सीरिया, तुर्की, इराण, अफगाणिस्तान, येमेन, सोमालिया, इथिओपिया, डेमोक्रॅटिक रिपब्लिक ऑफ काँगो, लिबिया, इंडोनेशिया, व्हिएतनाम, आर्मेनिया, बेलारूस आणि व्हेनेझुएला यांचा समावेश आहे. दरम्यान शनिवारी सौदी सरकारच्या पासपोर्ट महासंचालनालयाने प्रवास बंदीची सूचना दिली आहे.

हेही वाचा: युक्रेनचा निर्धार; रशियाबरोबर शस्त्रसंधी नाही!

सौदी अरेबियाच्या नागरिकांनी या देशात प्रवास करण्यावर बंदी घालण्यात आली आहे परंतु भारतीय नागरिकांनी भारतीय नागरिकांनी सौदी अरेबियात प्रवेश करण्यास बंदी घातली जाईल का नाही याबद्दल अजून कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आली नाही. दरम्यान कोरियासहित इतर देशांमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्यामुळे सुरक्षेच्या कारणावरून हा निर्णय घेण्यात आला आहे.

Web Title: Saudi Arebia Corona India Citizens Travelling Banned 15 Country

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top