खाशोगीवरून सौदीला दूर लोटता येणार नाही : ट्रम्प

वृत्तसंस्था
गुरुवार, 22 नोव्हेंबर 2018

वॉशिंग्टन: सौदी अरेबियाचे पत्रकार जमाल खाशोगी यांच्या हत्येप्रकरणावरून सौदी अरेबियाला दूर लोटता येणार नाही, असे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले आहे. सौदीबरोबर राजनैतिक संबंध राखणे आणि तेलाच्या जागतिक किमतीवर नियंत्रण राखणे हे अमेरिकेसाठी गरजेचे असल्याचे ट्रम्प यांनी नमूद केले. सौदीबरोबर संबंध बिघडले तर त्याचे जागतिक राजकारणावर विपरित परिणाम होईल. अमेरिकेच्या हितासाठी आणि सहकाऱ्यांसाठी सौदीबरोबर मैत्रिपूर्ण संबंध ठेवणे आवश्‍यक असल्याचे ते म्हणाले.

पत्रकार जमाल खाशोगी यांच्या हत्येसाठी सौदी शासकांना जबाबदार न धरण्याच्या भूमिकेचे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आज समर्थन केले आहे. हत्याप्रकरणावरून सौदी अरब आणि शासकांवर जगभरातून टीका केली जात आहे. यादरम्यान, अमेरिकेने खाशोगी हत्येप्रकरणाची दखल घेत इस्तंबूलच्या वाणिज्य दूतावासातील 17 जणांवर गेल्या आठवड्यात बंदी घातली होती. ट्रम्प यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, अमेरिकेचे हित साधणे हे पहिले कर्तव्य आहे. खाशोगी यांची हत्या झालेली असतानाही अमेरिका आपल्या हितासाठी आणि त्यांच्या क्षेत्रातील इस्राईल आणि अन्य सहकारी देशाच्या हितासाठी सौदीला मित्र ठेवणे आवश्‍यक आहे. जगातून दहशतवाद संपवणे हे आमचे महत्त्वपूर्ण लक्ष्य आहे, असेही ते म्हणाले. दरम्यान, ट्रम्प यांच्या मतावर विरोधकांनी टीका केली आहे.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Saudi can not be taken away says Donald Trump