Life After Death : जगभरात शास्त्रज्ञांनी का गोठवले आहेत ६०० मृतदेह ?

या तंत्राद्वारे त्यांना पुन्हा जिवंत केले जाऊ शकते.
Life After Death
Life After Deathgoogle

मुंबई : पुन्हा जिवंत होण्यासाठी शरीर गोठवण्याची प्रथा जगभर वाढत आहे. सध्या जगभरात सुमारे ६०० लोकांचे मृतदेह गोठवून ठेवण्यात आले आहेत. त्यापैकी ३०० हून अधिक मृतदेह फक्त अमेरिका आणि रशियामध्ये आहेत.

हे लोक कायदेशीररित्या मृत असले तरीही क्रायोनिक्स तंत्रज्ञानावर विश्वास ठेवणाऱ्या शास्त्रज्ञांचा असा विश्वास आहे की ते नुकतेच बेशुद्ध झाले आहेत. या तंत्राद्वारे त्यांना पुन्हा जिवंत केले जाऊ शकते. यामुळेच जगातील अनेक लोक मृत्यूपूर्वी आपल्या कुटुंबियांसमोर आपली इच्छा व्यक्त करत आहेत की त्यांचे शरीर कायमचे नष्ट करण्याऐवजी या तंत्राद्वारे सुरक्षित ठेवावे. हेही वाचा - शेतमजूर ते कॅनाॅल मॅन...जाणून घ्या एक यशोगाथा....

Life After Death
Physical Relation : लैंगिक संबंध ठेवताना जोडीदाराच्या अपेक्षा कशा पूर्ण कराल ?

अमेरिकन शास्त्रज्ञ डॉ. रिचर्ड गिब्सन यांच्या मते, जेव्हा कोणतेही तंत्रज्ञान एखाद्या व्यक्तीला जिवंत ठेवण्यास अपयशी ठरते, तेव्हा मृत्यूनंतर त्याचे शरीर फ्रीजरमध्ये ठेवले जाते या आशेने की भविष्यात विज्ञानाच्या आणखी प्रगतीमुळे ती व्यक्ती पुन्हा जिवंत होईल.

भारत, अमेरिकेसह अनेक देशांमध्ये खासगी प्रयोगशाळा

खासगी कंपन्यांनी भारत, अमेरिका, ऑस्ट्रेलिया, रशियासह डझनभर देशांमध्ये प्रयोगशाळा स्थापन केल्या आहेत, ज्या मृतदेह जतन करण्याचा दावा करतात. मात्र, इंडियन फ्युचर सोसायटीचे संस्थापक अविनाश कुमार सिंग यांच्या मते, मृतदेह गोठवण्याबाबत भारतात कोणताही स्पष्ट कायदा नाही. येथे न्यायालय आणि सरकारकडून परवानगी मिळणे फार कठीण आहे.

Life After Death
Physical Relation : शरीराच्या या अवयवाजवळ फोन ठेवल्यास लैंगिक क्षमता होईल कमी

लंडन उच्च न्यायालयात पहिले प्रकरण

2016 मध्ये लंडन हायकोर्टाच्या निर्णयात त्याचे पहिले प्रकरण समोर आले. येथे 17 ऑक्टोबर 2016 रोजी एका 14 वर्षीय मुलीचा कर्करोगाने मृत्यू झाला. मृत्यूपूर्वी त्यांनी लंडन हायकोर्टात कर्करोगाने मरणार असल्याची याचिका दाखल केली होती. अशा परिस्थितीत तिला पुन्हा एकदा जगण्याचा हक्क मिळायला हवा असे ती मानते.

मुलीच्या कुटुंबाला खात्री होती की 50 किंवा 100 वर्षांनंतर वैद्यकीय शास्त्र तिचा आजार बरा करू शकेल आणि डॉक्टर तिला पुन्हा जिवंत करू शकतील. त्यामुळेच या तंत्राद्वारे मुलीचे शरीर सुरक्षित ठेवण्याची विनंती त्यांनी न्यायालयाला केली.

जगभरात गोठवण्यात आलेल्या ६०० मृतदेहांपैकी एकाला बाहेर काढून त्याच्यावर उपचार केले जातील व ते यशस्वी ठरले तर सर्वांवर उपचार केले जातील, असे सांगितले जात आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com