वेगवान चाचणीसाठी भारत-इस्राईल एकत्र 

पीटीआय
Saturday, 25 July 2020

इस्राईलच्या संरक्षण संशोधन आणि विकास संचालनायाचे (डीडीआर अँड डी) एक पथक येत्या काही दिवसात दिल्लीत पोहोचणार असून ते वेगवान चाचणी विकसीत करण्यासाठी ते भारतातील ‘डीआरडीओ’ला सहकार्य करतील.

जेरुसलेम -  तीस सेकंदात घेता येणारी कोरोना चाचणी विकसीत करण्यासाठी भारत आणि इस्राईलमधील शास्त्रज्ञ एकत्र आले आहेत. इस्राईलची तंत्रकुशलता आणि मोठ्या प्रमाणावर उत्पादन करण्याची भारताची क्षमता या वैशिष्ट्यांना याद्वारे एकत्र आणण्यात आले आहे. इस्राईलचे एक उच्चस्तरीय पथक लवकरच यासाठी भारतात येणार असून ते ‘अंतिम टप्प्यातील चाचणी’ घेणार आहेत. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप   

इस्राईलच्या संरक्षण संशोधन आणि विकास संचालनायाचे (डीडीआर अँड डी) एक पथक येत्या काही दिवसात दिल्लीत पोहोचणार असून ते वेगवान चाचणी विकसीत करण्यासाठी ते भारतातील ‘डीआरडीओ’ला सहकार्य करतील, असे निवेदन इस्राईलच्या संरक्षण मंत्रालयाने प्रसिद्ध केले आहे. या प्रकल्पात इस्राईलचा परराष्ट्र विभाग आणि आरोग्य मंत्रालयही सहभागी आहे. भारतात येणारे हे पथक वेगवान चाचणी चाचण्यांची परिणामकारकता तपासून पाहण्यासाठी अनेक अंतिम टप्प्यातील चाचण्या घेतील, असे यामध्ये सांगितले आहे. संसर्गाला सुरुवात झाल्यापासून ‘डीडीआर अँड डी’ने अनेक चाचणी तंत्रज्ञानाचे प्रयोग केले आहेत. यातील अनेक प्रयोग पुढील टप्प्यातही गेले आहेत. मात्र, त्यांची परिणामकारकता तपासून पाहण्यासाठी मोठ्या संख्येने रुग्णांवर अशी चाचणी घेणे आवश्‍यक आहे. त्यासाठीच भारताबरोबर सहकार्य करणार असल्याचे इस्राईलने सांगितले. इस्राईलचे चाचणी तंत्रज्ञान रुग्णाच्या आवाजाची आणि श्‍वासाची तपासणी करणार आहे, तसेच आयसोथर्मल आणि पॉलिअमायनो ॲसिड चाचणीही केली जाणार आहे. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Scientists from India and Israel came together to develop the corona test