esakal | पाकिस्तानी सैन्यप्रमुखांनी आळवला काश्‍मीरचा सूर 
sakal

बोलून बातमी शोधा

Qamar-Bajwa

बाजवा यांनी सुरवातीला खुरैटा सेक्‍टरला भेट देत परिस्थितीचा आढावा घेतला. यानंतर त्यांनी जवानांशी संवाद साधला.जवानांनी कोणत्याही परिस्थितीत संकटाचा सामना करण्यासाठी तयार राहावे.

पाकिस्तानी सैन्यप्रमुखांनी आळवला काश्‍मीरचा सूर 

sakal_logo
By
वृत्तसंस्था

इस्लामाबाद -  भारताच्या सीमा रेषेवर पाकिस्तानी सैन्याकडून कुरापती सुरूच आहेत. त्यातच रविवारी पाकिस्तानी सैन्यप्रमुख कमर जावेद बाजवा यांनी अचानक सीमारेषेचा दौरा करत आढावा घेतला. या वेळी जवानांशी संवाद साधताना त्यांनी काश्‍मीरचा सूरदेखील आळवला. बाजवा यांच्या नियोजित दौऱ्याबाबत मात्र पाकिस्तानी प्रसार माध्यमांना कोणतीही माहिती देण्यात आलेली नव्हती. 

जगभरातील घडामोडी वाचण्यासाठी येथे क्लिक करा

बाजवा यांनी सुरवातीला खुरैटा सेक्‍टरला भेट देत परिस्थितीचा आढावा घेतला. यानंतर त्यांनी जवानांशी संवाद साधला. जवानांनी कोणत्याही परिस्थितीत संकटाचा सामना करण्यासाठी तयार राहावे. पाकिस्तानने काश्‍मीरचा दावा सोडलेला नाही. आम्ही शेवटपर्यंत काश्‍मीरसाठी लढत राहणार आहोत. काश्‍मिरी जनतेच्या कायम पाठिशी राहणा आहोत, असा सूर या वेळी बाजवा यांनी जवानांसमोर आळवला. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

बाजवा म्हणाले, की पाकिस्तानसमोर सध्या अनेक संकटे उभी आहेत. त्यामुळे कठीण काळातून आपल्याला जावे लागत आहे. काही देश पाकिस्तानला कमजोर करण्यासाठी प्रयत्न करत आहेत. त्यामुळे देशाला दुहेरी संकटांचा सामना करावा लागत आहे. आपल्याला विश्‍वास आहे की पाकिस्तानी सैन्य या संकटांचा ध्यैर्याने सामना करेल.