esakal | पाकिस्तानला मोठा दणका! सुरक्षा परिषदेने फेटाळली मागणी
sakal

बोलून बातमी शोधा

The Security Council rejected the call for two Indians to be declared terrorists

पाकिस्तानल जगभरात दहशतवाद्यांचं आश्रयस्थान म्हणून ओळखलं जातं. आता पाकिस्तान (pakistan) भारतावर देखील दहशदवादी राष्ट्र असल्याचा शिक्का पाडण्यासाठी सारखं कुरापती करताना दिसत आहे.

पाकिस्तानला मोठा दणका! सुरक्षा परिषदेने फेटाळली मागणी

sakal_logo
By
वृत्तसंस्था

न्यूयॉर्क- बुधवारी संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेत (United Nations Security Council) पाकिस्तानला पुन्हा एकदा भारताकडून हार पत्कारावी लागली आहे. संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेने बुधवारी 1267 प्रतिबंध समितीच्या ( 1267 special procedure ) अंतर्गत पाकिस्तान दोन भारतीय नागरिकांना दहशतवादी म्हणून जाहीर करावं यासाठी प्रयत्न करत होता. पण पाकिस्तानचा यात यश आलं नाही. या पाकिस्तानच्या मागणीला  संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेने फेटाळलं आहे.

पाकिस्तानल जगभरात दहशतवाद्यांचं आश्रयस्थान म्हणून ओळखलं जातं. आता पाकिस्तान (pakistan) भारतावर देखील दहशदवादी राष्ट्र असल्याचा शिक्का पाडण्यासाठी सारखं कुरापती करताना दिसत आहे. असाच एक प्रयत्न आता पाकिस्तानने भारताची आंतरराष्ट्रीय प्रतिमा डागाळण्याच्या दृष्टीने केलेला आहे. परंतु पाकिस्तानला हे भारतीय नागरिक दहशतवादी असल्याचे सिद्ध करता आलं नाही तसेच त्याचा कोणता पुरावाही सादर करता आला नाही. काही दिवसांपुर्वी 'जैश-ए-मोहम्मद'चा (jaish-e-mohammed) संस्थापक मसूद अझहरला (Masood Azhar) सुरक्षा परिषदेच्या 1267 समितीने 'जागतिक दहशतवादी' म्हणून जाहीर केलं होत. यामध्ये भारताने मोठी भूमिका बजावली होती.

पाकिस्तानने दिलेल्या या यादीमध्ये चार भारतीयांची नावे होती. ज्या चार भारतीय नागरिकांवर आरोप केले होते त्यात अंगारा अप्पाजी, गोबिंद पटनायक, अजय मिस्री और वेणुमाधव डोंगरा अशी नावे आहेत.  पाकिस्तानने असा आरोप केला आहे की हे सर्व अफगाणिस्तानातील एका गटाचे भाग होते ज्यांनी 'तहरीक-ए-तालिबान पाकिस्तान (Tehrik-i-Taliban Pakistan)आणि जमात-उल-अहरार' यांना दहशतवादी हल्ले करण्यास मदत केली होती.पाकिस्तानच्या या प्रयत्नाला अमेरिका, ब्रिटन, जर्मनी, फ्रान्स आणि बेल्जियमने  पुरावे सादर करण्याची मागणी करत ‘टेक्निकल होल्ड’ (technical hold) च्या माध्यमातून रोखले होते. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

सूत्रांनी सांगितले की, मिस्री आणि डोंगरा यांच्या नावावर पाकिस्तानचा दावा जून आणि जुलैमध्ये नाकारला होता आणि बुधवारी संयुक्त राष्ट्र सुरक्षा मंडळाने उर्वरित दोन व्यक्तींना दहशतवादी (terrorist) मानण्यास नकार दिला. 'पाकिस्तानकडून या चौघांची यादी दहशतवाही म्हणुन जाहीर करण्यास कोणताही पुरावा देण्यात आला नाही' अशी माहिती संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेने दिली आहे.

देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

संयुक्त राष्ट्रातील भारताचे स्थायी प्रतिनिधी टी.एस. तिरुमूर्ती यांनी ट्वीट करत माहिती दिली आहे की, 1267 च्या विशेष प्रक्रियेचा आंतरराष्ट्रीय राजकारणातील पाकिस्तानचे घृणास्पद प्रयत्न संयुक्त राष्ट्र सुरक्षा मंडळाने नाकारले आहे.  पाकिस्तानकडून नेहमीच असे दावे केले जात आहेत की भारत आपल्या भूमीवर दहशतवादाला चालना देत आहे, ज्यामुळे या प्रदेशात अस्थिरता पसरली आहे.  पण आजपर्यंत पाकिस्तानला या मुद्यावर भारताविरूद्ध कोणतेही पुरावे सादर करता आले नाहीत.

जगभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा