सिरियल किलरला पाकिस्तानात फाशी 

पीटीआय
गुरुवार, 18 ऑक्टोबर 2018

लाहोर : अल्पवयीन मुलीवरील बलात्कारप्रकरणी सिरियल किलर इम्रान अलीला (वय 24) आज सकाळी फाशीची शिक्षा देण्यात आली. लाहोरच्या कोट लखपत तुरुंगात बुधवारी पहाटे 5.30 वाजता (स्थानिक वेळेनुसार) फाशीची शिक्षा देण्यात आली. 

लाहोर : अल्पवयीन मुलीवरील बलात्कारप्रकरणी सिरियल किलर इम्रान अलीला (वय 24) आज सकाळी फाशीची शिक्षा देण्यात आली. लाहोरच्या कोट लखपत तुरुंगात बुधवारी पहाटे 5.30 वाजता (स्थानिक वेळेनुसार) फाशीची शिक्षा देण्यात आली. 

जिओ टीव्हीने दिलेल्या वृत्तानुसार, इम्रान अलीला न्यायाधीश आदिल सरवर आणि मुलीच्या वडिलांसमक्ष फासावर लटकवण्यात आले. घटनास्थळी रुग्णवाहिकादेखील तैनात होती. या वेळी अलीचा भाऊ आणि त्याचे दोन मित्र हजर होते. फाशी देण्यापूर्वी तुरुंग प्रशासनाने सुमारे 45 मिनिटे अली आणि त्याच्या कुटुंबीयाची भेट घडवून आणली. तत्पूर्वी काल पीडितेच्या वडिलांनी एका याचिकेद्वारे इम्रान अलीला सार्वजनिकरीत्या फाशी देण्यात यावी, अशी मागणी केली होती. मात्र ही याचिका न्यायालयाने फेटाळून लावली. गेल्या आठवड्यात दहशतवादविरोधी न्यायालयाने इम्रान अलीला 17 ऑक्‍टोबर रोजी फाशी देण्याचे निर्देश दिले होते.

गेल्या वर्षी जानेवारीत आरोपी इम्रान अलीने अल्पवयीन मुलीवर बलात्कार करून तिचा खून केला होता. तिचा मृतदेह लाहोरपासून 50 किलोमीटर अंतरावर कसूर येथे आढळला. घटनेनंतर दोन आठवड्यांत त्याला अटक करण्यात आली. या घटनेनंतर पाकिस्तानात तीव्र आंदोलन झाले होते. कसूर शहरात उसळलेल्या हिंसाचारात दोघांचा मृत्यू झाला होता. कसूरचा रहिवासी असलेला इम्रानचा बलात्कार आणि खुनाच्या नऊ प्रकरणांत सहभागी होता.  

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The serial killer is hanged in Pakistan