esakal | सीरम इन्स्टिट्यूट करणार स्पुटनिक व्हीचं भारतात उत्पादन
sakal

बोलून बातमी शोधा

sputnik v

सीरम इन्स्टिट्यूट करणार स्पुटनिक व्हीचं भारतात उत्पादन

sakal_logo
By
विनायक होगाडे

मॉस्को : कोरोनाच्या विरोधातील लढाईमध्ये महत्त्वाची भुमिका निभावणाऱ्या सीरम इन्स्टिट्यूटबाबत आता महत्त्वाची बातमी समोर येत आहे. रशियन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट फंड (RDIF) आणि सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया एकत्र येत सप्टेंबरमध्ये स्पुटनिक व्ही या लशीचं उत्पादन सुरु करणार आहे. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, भारतात एका वर्षामध्ये 300 दशलक्षहून अधिक डोस बनवले जातील. तसेच रशियन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट फंडचे सीईओ किरील दिमित्रीव यांनी सांगितलंय की, इतर काही निर्माते देखील भारतात या लशीचं उत्पादन करण्यासाठी उत्सुक आहेत.

सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाने कोरोना विषाणू विरोधआतील रशियन लस स्पुटनिक व्हीच्या उत्पादनासाठी मदत करण्याची घोषणा केली आहे. सीरम इन्स्टिट्यूट ही कोरोना लशीच्या उत्पादनाबाबतची जगातील सर्वांत मोठी कंपनी आहे. कंपनीने आतापर्यंत 500 दशलक्ष हून अधिक डोस बनवले आहेत. स्वत:ची लस बनवण्याव्यतिरिक्त कंपनी एस्ट्राझेनेका-ऑक्सफर्डद्वारे विकसित केलेली कोविशील्ड, नोवोवॅक्सद्वारा विकसित कोवोवॅक्सची निर्मिती देखील करत आहे. तसेच ब्रिटनची लस कोडाजेनिक्सचे परिक्षण देखील सीरम करत आहे.

हेही वाचा: कौरव-पांडव अन् धर्मयुद्ध; पंकजा मुंडेंच्या मनातील 'महाभारत'

तर सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे सीईओ अदर पूनावाला यांनी म्हटलंय की, स्पुटनिक लशीच्या निर्मितीसाठी RDIF सोबत काम करण्याबाबत मी आनंदी आहे. आम्हाला आशा आहे की सप्टेंबर महिन्यामध्ये ट्रायल बॅच सुरु होण्यासोबतच येणाऱ्या महिन्यांमध्ये लाखो डोस उपलब्ध होतील.

loading image