सीरियामध्ये रासायनिक शस्त्रांचा हल्ला

वृत्तसंस्था
सोमवार, 9 एप्रिल 2018

बैरुत - उत्तर सीरियातील घौटा शहरामध्ये बंडखोरांच्या ताब्यातील प्रदेशावर सीरियन सरकारकडून आज पुन्हा हवाई हल्ले करण्यात आले. घौटा भागातील या हल्ल्यात रासायनिक अस्त्रांचा वापर झाल्याचा आरोप होतो आहे. या हल्ल्याचा संयुक्त राष्ट्र संघानेही निषेध केला आहे. यामध्ये 40 जणांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.  

ब्रिटनमधील 'सीरियन ऑब्झर्वेटरी फॉर ह्युमन राइट्स'ने दिलेल्या माहितीनुसार, मागील आठवड्यामध्ये याच भागात करण्यात आलेल्या रासायनिक हल्ल्यामध्ये 80 लोक ठार झाले होते. हल्ल्यानंतर अनेक जणांना श्वासोच्छवासाचा त्रास होऊ लागल्याची माहितीही 'ऑब्झर्वेटरी'ने दिली आहे. या हल्ल्यांचा अमेरिकेनेही निषेध केला होता. 'ही वृत्ते खरी असतील, तर आंतरराष्ट्रीय समुदायाने तातडीने याला प्रत्युत्तर देण्याची गरज आहे,' अशी प्रतिक्रिया अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्त्या हीदर नौअर्ट यांनी दिली आहे. मात्र, रशिया आणि असद सरकारने रासायनिक हल्ल्याचे वृत्त फेटाळून लावले होते. 

सीरियन सरकार आणि "जैश अल इस्लाम' या दोन संघटनांमध्ये बोलणी सुरू असताना सरकारकडून आज शस्त्रसंधीचे उल्लंघन करण्यात आले.

Web Title: Several dead, wounded in strike on Syria air base