
Imran Khan: होय मी प्ले बॉय होतो... सेक्स टेप प्रकरणी इम्रान खान यांचा धक्कादायक खुलासा
पाकिस्तानचे (Pakistan) माजी पंतप्रधान आणि तेहरीक ए इन्साफ (Tehreek-e-Insaf) पार्टीचे सर्वेसर्वा इम्रान खान (Imran Khan) यांच्याबद्दल एक नवा वाद निर्माण झाला आहे. दरम्यान यासंदर्भात भाष्य करत इम्रान खान यांनी कबुली दिली आहे. होय, मी (प्लेबॉय) होतो. असे विधान खान यांनी केलं आहे.
एका महिलेसोबतचे त्यांचे एक कथीत सेक्स कॉल (Sex Call ) रेकॉर्डींग ऑनलाईन रुपात बाहेर आले आहे. इम्रान खान यांच्या तीन कथित ऑडिओ क्लिप लीक झाल्या होत्या. मंत्री राणा सनाउल्लाह यांनी दावा केला की, या ऑडिओ क्लिप खऱ्या आहेत आणि त्याचप्रमाणे खान यांच्या व्हिडिओ क्लिप येत्या काही दिवसांत समोर येऊ शकतात.
हेही वाचा: Delhi Crime: कवटी फुटलेली, ब्रेन मॅटर गायब तर...ऑटोप्सी रिपोर्टमध्ये धक्कादायक खुलासे
दरम्यान, इम्रान खान यांनी माध्यमांशी बोलताना या सर्वावर कबुली दिली आहे.
हेही वाचा: Kubra Khan : 'पुढाऱ्यांना फसवण्यासाठी लष्कराच्या मदतीने अभिनेत्री करतात हनी ट्रॅप'
काय म्हणाले इम्रान खान?
माझ्या विरोधात ज्या क्लिप व्हायरल होत आहेत, तसंच ज्या ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्या आहेत पण यातून आपण आपल्या देशातल्या युवकांना काय संदेश देत आहोत? मला ही बाब मान्य आहे की एक काळ असा होता की मी प्लेबॉय होतो देवदूत नाही, मी कधीही तसा दावा केला नाही. मात्र जनरल बाजवा यांनी जेव्हा माझा प्लेबॉय असा उल्लेख केला तेव्हा मला कळलं होतं की हे मला माझ्या पंतप्रधान पदावरून खाली खेचणार.
ऑडिओ क्लिपमध्ये काय आहे?
या व्हिडिओत 'तुम्ही माझे हृदय तोडले' असे एक महिला त्यांना म्हणत असल्याचा दावा केला जातो आहे. दोन व्यक्तींमधला हा संवाद अत्यंत अश्लिल भाषेत असून या संवादातील पुरुषाचा आवाज हा इम्रान खान यांचा असल्याचे दावा केला जातो आहे.
एक महिला इम्रान खान यांच्याशी बोलताना 'माझा प्रायव्हेट पार्ट दुखत' असल्याचे सांगताना कथीत रित्या ऐकायला मिळते. पुढे बोलताना ती महिला म्हणते की, मला बरे वाटले (प्रकृती ठिक असेल) तरच मी आपल्याला भेटायला येईन. यावर इमरान खान म्हणतात की, माझे कुटंब आणि मुले येत आहेत. त्यामुळे त्यातून मला शक्य झाले तर मी स्वत:हून तुला उद्या भेटायला येईन.