Delhi Crime
Delhi CrimeEsakal

Delhi Crime: कवटी फुटलेली, ब्रेन मॅटर गायब तर...ऑटोप्सी रिपोर्टमध्ये धक्कादायक खुलासे

मृत तरुणीचा ऑटोप्सी रिपोर्ट आता समोर आला असून, त्यामध्ये धक्कादायक माहिती समोर आली

31 डिसेंबरच्या रात्री दिल्लीमध्ये ज्या पद्धतीने एका तरुणीचा मृत्यू झालाय, ते पाहून देश हादरुन गेला. याप्रकरणी आता केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी लक्ष घातलेलं असून यंत्रणेला आदेश दिले आहेत. यामध्ये नवनवे खुलासे समोर येत आहेत. मृत्यू झालेल्या तरुणीचा ऑटोप्सी रिपोर्ट आता समोर आला असून, त्यामध्ये धक्कादायक माहिती समोर आली आहे.

तरुणीच्या ऑटोप्सी अहवालातून असं समोर आलं आहे की, तिची कवटी पूर्णपणे फुटलेली होती, ब्रेन मॅटर गायब झाले होते, पाठीचा कणा फ्रॅक्चर होता आणि तिच्या संपूर्ण शरीरावर एकूण 40 जखमा होत्या. 1 जानेवारी रोजी तरुणीच्या स्कूटीला धडक देत कारने तिला कित्येक किलोमीटर फरफटत नेलं, त्यामुळे तिचा मृत्यू झाला आणि तिच्या शरीराचीही भयानक अवस्था झाली.

दिल्लीतील मौलाना आझाद मेडिकल कॉलेज (एमएएमसी) येथील डॉक्टरांच्या वैद्यकीय बोर्डाने तिच्या शरीराची ऑटोप्सी केली आणि तरुणीच्या शरीरावर अनेक जखमा असल्याची माहिती दिल्ली पोलिसांना दिली आहे. तर तिच्या अंगावर इतक्या जखमा झाल्या. त्यांना माती घाण लागली आणि फरफटत नेल्यामुळे जास्त रक्तस्त्राव झाल्यामुळे तिचा मृत्यू झाला आहे.

Delhi Crime
BharatPe चे सीईओ सुहेल समीर यांचा राजीनामा; काय आहे कारण?

अंजलीच्या बरगड्या मागच्या बाजूने बाहेर पडल्या आणि फरफटत नेल्यामुळे चिरडल्या गेल्या होत्या. अहवालात असंही नमूद करण्यात आलं आहे की अंजलीच्या कमरेच्या भागात मणक्याचे फ्रॅक्चर होते आणि तिचे जवळजवळ संपूर्ण शरीर मातीने आणि घाणीने भरले होते. सदमा लागल्याने आणि जास्त रक्तस्त्राव झाल्याने तरुणीचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे. त्यानंतर कारमध्ये अडकल्यानंतर शरीराच्या इतर भागात गंभीर जखमा झाल्या होत्या.

Delhi Crime
Mahavitaran Strike : राज्यातील वीज कर्मचारी तीन दिवस संपावर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com