सेक्स डॉलच्या 'प्रेमात' पडतोय कोरिया! महिला संतापल्या, काय आहे प्रकरण?

sex doll
sex doll
Updated on

कोरियात सेक्स डॉलच्या वापरावरुन वातावरण तापले आहे. सेक्स डॉल्सच्या आयातीवरील बंदी काही दिवसांपूर्वी हटवण्यात आली होती. याला महिलांनी जोरदार विरोध करत पुन्हा बंदी घालण्याची मागणी लावून धरली आहे.

सेक्स डॉलचा वापर हा खरे तर मानवी प्रतिष्ठेवरचा हल्ला असल्याचे महिलांचे मत आहे.  कोरियाच्या सर्वोच्च न्यायालयाने यावरील बंदी उठवण्याचे आदेश दिले होते. दरम्यान यावरुन पुन्हा वाद रंगला आहे. 

सेक्स डॉल बनवणाऱ्या कंपनीने सोशल मीडियावर डॉलच्या प्रमोशनसाठी काही पोस्ट केल्या होत्या. या पोस्टमध्ये कंपनीने सेक्स डॉलला 'रियल डॉल' म्हंटले आहे. कंपनीने सेक्स डॉलसाठी तीन पर्याय असल्याचे सांगितले होते. यामध्ये ४ फूट ९ इंच, ५ फूट तीन इंच आणि ५ फूट ६ इंच साईज उपलब्ध असल्याचे सांगितले होते. 

sex doll
Chat GPT : "पुढच्या दोन वर्षांत Google संपेल"; Gmail च्या निर्मात्याची भविष्यवाणी

सेक्स डॉल उत्पादक या डॉलवरील बंदीला विरोध करत होते. त्यानंतर २६ डिसेंबर रोजी डॉलवरील बंदी उठवण्यात आली. सेक्स डॉल्स बनवणाऱ्या कंपन्यांनी याविरोधात सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली होती आणि नंतर आपल्या निर्णयात कोर्टाने निर्मात्याला ती आयात करण्याचे आदेश दिले आणि कस्टम सर्व्हिसला बंदी उठवण्याचे निर्देश दिले.

"सेक्स डॉल घटनात्मक व्यवस्थेला बाधा आणत नाहीत" यावर न्यायालयाने सहमती दर्शवली. मात्र आता हा वाद पेटला आहे. 

sex doll
Adani Group : इस्त्रायलच्या हैफा बंदराचा ताबा अदाणी ग्रुपने घेतला

काही महिला सेक्स डॉलवरील बंदी उठवल्यामुळे आक्रमक झाल्या आहेत. यामुळे महिलांच्या प्रतिष्ठेला धक्का बसतो. सेक्स डॉलवरील बंदी हटवल्याने लोक महिलांना लैंगिक साधन मानू लागतील, असे महिलांचे म्हणणे आहे.

सेक्स डॉलमध्ये स्त्रीच्या शरीरासारखी सर्व वैशिष्ट्ये आहेत. सेक्स डॉल वेश्याव्यवसाय आणि पोर्नोग्राफीला प्रोत्साहन देतात. यामुळे लैंगिक शोषण वाढण्याची शक्यता आहे, असे देखील काही विरोध करणाऱ्या संघटनांचे म्हटले आहे.

sex doll
Gold News : जगभरातल्या बँकांच्या सोनेखरेदीवर उड्या; 55 वर्षांनंतर सर्वात जास्त खरेदी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com