चीन, ईस्ट इंडिया कंपनीत साम्य नाही; पाकिस्तानच्या पंतप्रधानांचं वक्तव्य

Shahbaz Sharif said that there is no resemblance between China and the East India Company under the British rule
Shahbaz Sharif said that there is no resemblance between China and the East India Company under the British ruleShahbaz Sharif said that there is no resemblance between China and the East India Company under the British rule

नवी दिल्ली : चीन हा पाकिस्तानचा सर्वांत जवळचा मित्र आहे. चीन आणि ब्रिटिश राजवटीतील ईस्ट इंडिया कंपनी यांच्यात साम्य नाही. राजनैतिक आणि आर्थिक पातळीवर चीनने पाकिस्तानला नेहमीच पाठिंबा दिला आहे. पाकिस्तान आणि विशेषतः: बलुचिस्तानच्या विकासात चीनने महत्त्वाची भूमिका बजावली आहे. अशा परिस्थितीत बलुचिस्तानमधील जनतेने चिनी गुंतवणूकदारांना महत्त्व देण्याचे आवाहन पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ (Shahbaz Sharif) यांनी केले. (Shahbaz Sharif said that there is no resemblance between China and the East India Company under the British rule)

पाकिस्तानचे (Pakistan) पंतप्रधान शाहबाज शरीफ (Shahbaz Sharif) २४ जून रोजी बलुचिस्तानच्या ग्वादर दौऱ्यावर होते. त्यांनी बलुचिस्तानच्या लोकांना विकासासाठी या प्रदेशात गुंतवणूक करणाऱ्या परदेशी गुंतवणूकदारांच्या सुरक्षिततेची खात्री करण्याचे आवाहन केले. स्थानिक लोकांसमोरील आव्हाने सोडवणे ही सरकारची जबाबदारी आहे. मच्छीमारांच्या समस्या प्राधान्याने सोडविल्या जातील, असेही शरीफ म्हणाले.

Shahbaz Sharif said that there is no resemblance between China and the East India Company under the British rule
एकनाथ शिंदे आपल्या ‘त्या’ विधानावरून पलटले; स्पष्टीकरण देत म्हणाले...

स्थानिक जनतेचे प्रश्न सोडविल्याशिवाय राज्याचा विकास निरर्थक आहे, असेही शाहबाज शरीफ म्हणाले. ग्वादर हे बलुचिस्तानच्या स्वातंत्र्याची मागणी करणाऱ्या लढवय्यांचे केंद्र राहिले आहे. काही वर्षांत या भागात चिनी (China) कारवायांमध्ये वाढ झाल्यामुळे दहशतवादी गटांकडून चिनी संबंधित प्रकल्प आणि चिनी कर्मचाऱ्यांना लक्ष्य करण्यात आले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com