एकनाथ शिंदे आपल्या ‘त्या’ विधानावरून पलटले; स्पष्टीकरण देत म्हणाले...

Eknath Shinde
Eknath Shindeesakal

मुंबई : शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांच्यामुळे (Eknath Shinde) महाराष्ट्रातील राजकारण ढवळून निघाले आहे. शिंदेसोबत असलेले आमदार बंडावर कायम आहेत. त्यांनी आपल्यावतीने कोणताही निर्णय घेण्याचा अधिकार एकनाथ शिंदे यांना दिला आहे. यामुळे शिंदेंची हिंमत वाढली आहे. तसेच महाविकास आघाडी सरकार धोक्यात आले आहे. अशात एकनाथ शिंदे यांचे मोठे वक्तव्य आले आहे. त्यांच्या वक्तव्याने बंडखोर आमदारांची चिंता वाढू शकते. (Eknath Shinde reversed his statement)

एकनाथ शिंदे (Eknath Shinde) हे बंड पुकारलेल्या आमदारांशी संवाद साधताना ‘एक मोठी शक्ती आपल्याला साथ देत आहे’ असे म्हणाले होते. काहीही झाले तरी आम्ही जिंकू. सर्व सुख आणि दुख आपलेच आहे, असेही म्हणाले होते. मी एक मोठी शक्ती आपल्याला साथ देत आहे असे म्हटले तेव्हा मला बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांची शक्ती असे म्हणायचे होते, असे एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत एकनाथ शिंदे म्हणाले. यामुळे शिंदे हे आपल्या पूर्वीच्या विधानावरून पलटल्याचे दिसते.

Eknath Shinde
मुख्यमंत्र्यांनी हलक्यात घेतले ‘पेन ड्राइव्ह’ कांड; आमदारांची माहिती कशी मिळाली नाही?

आम्ही घेतलेला निर्णय ऐतिहासिक असल्याचे त्यांनी मला सांगितले आहे. तुमच्याकडे आमची सर्व शक्ती आहे. तुम्हाला काही हवे असल्यास आम्ही निराश करणार नाही. जेव्हा जेव्हा आम्हाला कोणत्याही मदतीची आवश्यकता असेल तेव्हा ती दिली जाईल, असेही आश्वासन पक्षाने दिल्याचे एकनाथ शिंदे आमदारांना (MLA) सांगत असल्याचे व्हिडिओमध्ये (video) दिसले. मात्र, त्यांनी कोणत्याही पक्षाचे नाव घेतले नाही.

हा व्हिडिओ आल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी गुरुवारी पत्रकार परिषद घेतली होती. यात त्यांनी देशातील राष्ट्रीय पक्षांची नावे वाचली. त्याचबरोबर यामागे भाजपशिवाय कोणते घटक असू शकतात, हेही सांगितले. बहुमत विधानसभेत सिद्ध केले जाईल. गुवाहाटीत बसून नाही, असेही शरद पवार म्हणाले होते.

Eknath Shinde
उदयनराजे भोसले म्हणाले, ‘माविआ’चे हे अनैसर्गिक गठबंधन होतं...

बंडखोर आमदारांविरोधात शिवसेनेचे कार्यकर्ते संतापले

एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेलेल्या बंडखोर शिवसेना आमदारांविरोधात कार्यकर्त्यांचा रोष उफाळून येत आहे. शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी शुक्रवारी कुर्ला येथील बंडखोर आमदार मंगेश कुडाळकर यांच्या कार्यालयाची तोडफोड केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com